महिन्याभरात केवळ 10 दिवस काम आणि वर्षाचा पगार 1.3 कोटी रूपये; जाणून घ्या या नोकरीबद्दल! Job Offer

मुंबई | सध्या एका नोकरीच्या ऑफरची (Job Offer) सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. कारण या नोकरीसाठी महिन्यातील फक्त दहा दिवस काम आणि 20 दिवस सुट्या आहेत & पॅकेज म्हणाल तर तब्बल कोट्यावधीच्या घरात आहे. सोबत अतिरिक्त बोनसही मिळणार आहे. आता ही नोकरी नेमकी कुठं आहे आणि काम काय करावं लागणार ते जाणून घेऊ..

ही नोकरी कुठे आणि कोणती आहे वाचा..

ब्रिटिश मेडिकल जर्नलने ऑस्ट्रेलियात ज्युनियर डॉक्टरच्या पदासाठी नोकरीची ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीचे ट्टिट लेखक ॲडम के यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये युनायटेड किंग्डममधील डॉक्टरांना नोकरीची ऑफर देत आमंत्रित करण्यासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. यासाठी तब्बल 2 लाख 40 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 1.3 कोटी रूपयांच्या इयरली पॅकेजची ऑफर दिली आहे. सोबतच महिन्यातून 20 दिवस सुट्टी दिली जाईल आणि या सुट्टीमध्ये ‘भटका, स्विमिंगला जा किंवा सर्फिंग करा असे सांगण्यात आले आहे.

ब्लागीबोन मेडिकल रिक्रूटमेंटची ही ऑफर आहे. तसेच ही ऑफर स्वीकारणाऱ्यांना 12 महिने नोकरी करु असे लिखित दिल्यास साईन ऑन बोनस म्हणजेच नोकरी स्वीकारल्याबद्दल 5 हजार डॉलर्स (भारतीय चलनानुसार 2.74 लाख रुपये) अतिरिक्त दिले जाणार आहेत.

आमच्याकडे आरोग्य क्षेत्रातील नोकऱ्यांच्या बऱ्याच जागा रिकाम्या असून तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल असंही बुल्गीबॉन कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. 

काय आहे संदर्भ

इंडिपेंडंट न्यूजनुसार, जाहिरात ॲडम के यांच्या NHS मध्ये कनिष्ठ डॉक्टर म्हणून त्यांच्या अनुभवांबद्दलच्या सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकाचा संदर्भ आहे. ब्रिस्बेनमधील BMJ वेबसाइटवर पोस्ट केलेल्या जाहिरातीत एका वर्षासाठी प्रति शिफ्ट रु. 1 लाख, तसेच 12 महिन्यांनंतर वेगळा बोनस देण्याचे वचन दिले होते.

Recent Articles