12वी उत्तीर्णांना भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नोकरीची संधी | AAI Recruitment

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment) येथे सुरक्षा स्क्रीनर पदासाठी भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून, पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, नियुक्ती झाल्यानंतर देण्यात येणारा पगार आदींबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबाबत ‘स्टडी कॅफे’ने वृत्त दिले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे एकूण 25 सुरक्षा स्क्रीनर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड ही मेडिकल टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे करण्यात केली जाईल. (AAI Recruitment)

भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार हे रीतसर भरलेला अर्ज, महत्त्वाची कागदपत्रं यासह 12 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता थेट इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहू शकतील. हे इंटरव्ह्यू कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, एएआय, जुनी टर्मिनल बिल्डिंग, एस. व्ही. विमानतळ, रायपूर- 492015 येथे होणार आहेत. 

वयोमर्यादा
सुरक्षा स्क्रीनर पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे. एससी व एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात 5 वर्षे आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता
सुरक्षा स्क्रीनर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10+2 / इंटरमिजिएट / बारावी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठ, संस्थेतून समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे बीसीएएस (BCAS) बेसिक एव्हीएसईसी (AVSEC) वैध प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेसह इंग्रजी, हिंदी वाचण्याची/बोलण्याची क्षमता असावी.

निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 बेसिक पगारासह एचआरए, वॉशिंग भत्ता, बेसिक एव्हीएसईसी भत्ता, मेडिकल आउटडोअर (फिक्स्ड), कन्व्हेयन्स, स्क्रीनर भत्ता व नियमानुसार वार्षिक वाढ अशा पद्धतीने वेतन दिले जाईल.

सदर नोकरी 3 वर्षांच्या कालावधीसाठी करारावर आधारित असेल. रायपूर येथील एस. व्ही. विमानतळावर नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराने पुढील तीन वर्षात केलेल्या कामगिरीच्या आधारावर त्याचा नोकरीचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. इच्छुक व पात्र उमेदवार अधिक माहितीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
https://www.aai.aero/en/recruitment/

Recent Articles