आदिवासी विकास विभाग अंतर्गत लिपिक, सहायक तसेच अन्य 614 जागांची मोठी भरती; 1 लाख 22 हजारापर्यंत पगार | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024
मुंबई | आदिवासी विकास महामंडळ येथे विविध रिक्त पदांची मोठी भरती (Adivasi Vikas Vibhag Bharti 2024) केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 614 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ. पदे भरली जाणार आहेत.
वरील रिक्त पदांच्या एकूण 614 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने 12 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 (मुदतवाढ)आहे.
- पदाचे नाव – वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक / संशोधन सहाय्यक / उपलेखापाल मुख्यलिपिक-सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ)/ आदिवासी विकास निरिक्षक (नॉनपेसा) / वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक/कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी / लघुटंकलेखक / गृहपाल-स्त्री / गृहपाल पुरुष / अधिक्षक स्त्री/ अधिक्षक पुरुष / ग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल / प्रयोगशाळा सहाय्यक / कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक इ.
- पद संख्या – 614 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा – 18 वर्षे ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
- खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
आदिवासी विकास विभागाची दिनांक 5.10.2024 रोजी जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर जाहीरातीनुसार उमेदवाराना ऑनलाईन अर्ज करण्या करिता दिनांक 12.10.2024 ते 02.11.2024 या कालावधी करीता मुदत देण्यात आलेली होती. आता, उमेदवारांना सदर जाहीरातीनुसार विविध पदांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता दिनांक 5.11.2024 ते दिनांक 30.11.2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान व्दितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवीसंस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल. |
संशोधन सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील |
आदिवासी विकास निरिक्षक | मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील |
लघुटंकलेखक | ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र |
गृहपाल (पुरुष) | मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखे तील मान्यता प्राप्त विद्यापीठा ची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार |
गृहपाल (स्त्री) | समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार |
अधिक्षक (पुरुष) | मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार |
अधिक्षक (स्त्री) | मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार |
ग्रंथपाल | ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील |
प्रयोगशाळा सहाय्यक | ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. |
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | मान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित / अर्थशास्त्र/ वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. |
सहाय्यक ग्रंथपाल | ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे. |
कॉमेरामन-कम-प्रोजेक्टर ऑपरेटर वेतन श्रेणी एस-१० | उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे, जे मान्यताप्राप्त संस्थेची फोटोग्राफी या विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात आणि शासन मान्य संस्थेमधील फोटाग्राफी, प्रिटींग, एनलार्जिंग आणि त्याशी संबंधित शास्त्र किंवा तंत्रज्ञान इत्यादी आणि ऑडीओ व्हीज्यूअल मशिन चालविण्याचा प्रत्यक्ष कामाचा ३ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव औद्योगिक प्रशिक्षक संस्था/शासनमान्य संस्थेतून प्राप्त केला आहे |
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | सांविधीक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषीत केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले |
उच्च श्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल. |
निम्न श्रेणी लघुलेखक | शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम ब) १. लघुलेखक (इंग्रजी) निम्न श्रेणी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण २. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण वरील ब मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य) क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनीट ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनीट इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी. संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक | 38600-122800 |
संशोधन सहाय्यक | 38600-122800 |
उपलेखापाल-मुख्य लिपिक | 35400-112400 |
आदिवासी विकास निरिक्षक | 35400-112400 |
वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक | 25500-81100 |
लघुटंकलेखक | 25500-81100 |
गृहपाल (पुरुष) | 38600-122800 |
गृहपाल (स्त्री) | 38600-122800 |
अधिक्षक (पुरुष) | 25500-81100 |
अधिक्षक (स्त्री) | 25500-81100 |
ग्रंथपाल | 25500-81100 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 19900-63200 |
उपलेखापाल/ मुख्य लिपिक/सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ) | 35400-112400 |
सहाय्यक ग्रंथपाल | 21700-69100 |
उच्च श्रेणी लघुलेखक | 41800-132300 |
निम्न श्रेणी लघुलेखक | 38600-122800 |
Important Dates | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 12/10/2024 03:00 PM |
Closure of registration of application | 12/11/2024 |
Closure for editing application details | 12/11/2024 |
Last date for printing your application | 17/11/2024 |
Online Fee Payment | 12/10/2024 03:00 PM to 12/11/2024 |
Adivasi Vikas Mahamandal Bharti Details 2024
- १) परोक्षेत्ता दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
- २) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित क्योमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शतीं, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याचाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
- ३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद करणे, अर्शतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील, व त्यांचा निर्णय अंतिम असेल, पात्रावत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल, सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात बाद, तक्रारी, उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.
Maha Tribal Development Department Jobs 2024 – Important Documents
- परीक्षेसाठी केलेल्या ऑनलाईन आवेदन पत्राची छायांकित प्रत.
- शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे
- संगणक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- परीक्षा शुल्क भरणा केलेल्या पावतीची प्रत.
- अर्जात नमूद केलेंप्रमाणे जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र / नॉन क्रीमीलेअर / इतर आवश्यक प्रमाणपत्र
How to Apply For Maha Tribal Development Department Recruitment 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- ऑनलाइन अर्जामध्ये फोटो आणि स्वाक्षरीशिवाय अपलोड केलेला ऑनलाइन अर्ज/अयशस्वी शुल्क भरणे यासारख्या कोणत्याही बाबतीत अपूर्ण असेल तर तो वैध मानला जाणार नाही.
- सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 12 October 2024 पासून सुरू होणार आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यापूर्वी लक्षात घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे
- ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादीचे स्कॅन करून ठेवावे.
- छायाचित्र (४.५ से.मी. x ३.५ से.मी.) १०.१ २ स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
- स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा (काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)
- इंग्रजी भाषेतील खाली दिलेला मजकुर असलेले स्वहस्ताक्षरात लिहिलेले घोषणापत्र (काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर)
- हे सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज या जाहिरातीतील मुद्दा ११:३ मध्ये नमूद तपशिलाप्रमाणे आहेत याची खात्री
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी करावी इंग्रजी भाषेतील मोठ्या अक्षरातील (Capital Letters) स्वाक्षरी स्विकारली जाणार नाही
- डाव्या अंगठ्याचा ठसा योग्यरित्या स्कॅन केलेला असावा आणि त्यावर डाग येऊ देऊ नये. (उमेदवारास अंगठा नसल्यास असा उमेदवार अर्ज करण्यासाठी उजव्या अंगठ्याचा वापर करू शकतो)
PDF जाहिरात | Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Bharti Online Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | tribal.maharashtra.gov.in |