ॲमेझॉन मध्ये 12 वी ते पदवीधरांना नोकरी; Work from Home साठी संधी, दिलेल्या लिंकवरून त्वरित अर्ज करा | Amazon Career

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी जगप्रसिध्द अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी Amazon मध्ये विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Amazon Career) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ॲमेझॉन ही एक ई-कॉमर्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, डिजिटल स्ट्रीमिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. 12वी ते पदवीधरांसाठी यासाठी अर्ज (Work from Home) करता येणार आहेत.

उपलब्ध माहितीनुसार ॲमेझॉन मध्ये भारतीय रिझन साठी सध्या 521 जागा रिक्त आहेत. यामध्ये सेल्स, अॅडव्हर्टायझिंग आणि अकाऊंट मॅनेजमेन्ट साठी 100 जागा रिक्त आहेत. फायनान्स आणि ग्लोबल बिझिनेस सर्विससाठी 56 जागा रिक्त आहेत. सप्लाय चेन/ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटसाठी 68 जागा रिक्त आहेत. कस्टमर सर्विससाठी 23 जागा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट 23 जागा, बायिंग, प्लॅनिंग आणि इनस्टॉक मॅनेजमेंट 23 जागा अशा विविध पदांसाठी 521 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. (Amazon Career)

ॲमेझॉन मधील नोकरीसाठी अर्ज (Amazon Career) करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण 12 वी तसेच किमान 6 महिने कामाचा अनुभव गरजेचा आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या क्षेत्रातील पदवी आणि अनुभव देखील वेगवेगळा असू शकतो. यापैकी अनेक पदे ही Work from Home साठी देखील भरली जाणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांनी त्यासाठी दिलेल्या लिंकवरून संबंधित पोस्टसाठी देण्यात आलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावेत.

यापैकी अनेक पदांसाठी किमान अनुभव 6 महिने आणि 12वी पर्यंतचे शिक्षण असल्याने नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी ही चांगली संधी आहे. उपलब्ध जागांपैकी 65 रिक्त जागा ह्या महाराष्ट्रासाठी आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी Amazon Career या लिंकवर जाऊन त्या त्या पदांसाठी अर्ज करावेत. लिंकवर गेल्यानंतर खाली दिलेल्या पध्दतीने सुध्दा रिक्त जागा शोधू शकता. किंवा खाली स्क्रोल केल्यानंतर कॅटेगरी, ठिकाण यानुसार देखील जॉब लिस्ट पाहता येईल.

Amazon Work from Home

Recent Articles