Amazon Job : भारतात ॲमेझॉन मध्ये 1 लाख 32 हजार नोकऱ्या ! संधी चुकवू नका

मुंबई | जगभरातील मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. परंतु आता अॅमेझॉन (Amazon Job) मधून एक चांगली बातमी समोर आली आहे. अ‍ॅमेझॉन भारतात मोठी गुंतवणूक करणार असून दरवर्षी 1.32 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. उपलब्ध नोकऱ्यांसाठी अर्ज करायचा असल्यास अधिकृत लिंक खाली दिली आहे.

Amazon Web Services (AWS) 2030 पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये 1,05,600 कोटी (12.7 अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करत आहे. Amazon.com Inc च्या क्लाउड कंप्युटिंग विभागाने ही माहिती दिली आहे. या गुंतवणुकीमुळे देशात दरवर्षी अंदाजे सरासरी 131,700 नोकऱ्या (Amazon Job) निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

AWS ने 2016 आणि 2022 दरम्यान भारतात 3 अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केली, ज्यामुळे भारतीय व्यवसायांमध्ये वार्षिक 39500 नोकऱ्या निर्माण होण्यास मदत झाली.

AWS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अ‍ॅडम सेलिपस्की म्हणाले, “AWS एक डिजिटल पॉवरहाऊस म्हणून भारताच्या वाढीसाठी दीर्घकाळापासून काम करत आहे. 2016 पासून आमच्या पायाभूत सुविधांमुळे मोठी प्रगती झाली आहे.”

Click Here To Apply for Amazon Job Vacancies 2023

इकॉनॉमिक टाईम्सने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत एक “उज्ज्वल स्थान” राहिले आहे, जेथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. मला माहित आहे की सरकार २०२५ पर्यंत ट्रिलियन-डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पुढील काही वर्षांत भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे. ह्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतासाठी क्लाउड तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅडम सेलिपस्की यांनी स्पष्ट केले.

Recent Articles