Career

खुशखबर! ॲपलकडून यंदा भारतात 6 लाख नोकऱ्या, महिलांची मोठ्या प्रमाणात होणार भरती | Apple Recruitment 2024

नवी दिल्ली: देशात टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या क्षेत्रात रोजगारच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे भारतात ॲपलच्या उत्पादनांना प्रचंड मागणी असल्याने कंपनीने भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

एक अहवालानुसार, ॲपल यावर्षी भारतात सुमारे 6 लाख नोकऱ्या (Apple Recruitment 2024) निर्माण करण्याची अपेक्षा आहे. यामध्ये थेट ॲपल कंपनीसोबत काम करण्याच्या 2 लाख संधी असून त्यापैकी 70% संधी महिलांसाठी राखीव असतील. तर उर्वरित नोकऱ्या ॲपलच्या भागीदार कंपन्यामध्ये उपलब्ध होतील.

ॲपलने चीनमधील उत्पादन कमी करून भारतात केंद्रित होण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारताला आपला नवीन उत्पादन हब म्हणून पाहिले आहे. यामुळे देशातील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

ॲपल आणि त्याच्या भागीदार कंपन्यांनी एकत्रितपणे 80 हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यामध्ये फॉक्सकॉन, विस्ट्रोन (टाटा इलेक्ट्रॉनिक्स), पेगाट्रॉन, टाटा ग्रुप, सेलकॉम्प, मदरसन, फॉक्सलिंक, सनवोडा, एटीएल आणि जबील या कंपन्यांचा समावेश आहे.

सरकारच्या मते, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात एका थेट नोकरीमुळे तीन अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतात. म्हणजेच, ॲपलच्या या गुंतवणुकीमुळे देशात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

2020 मध्ये सुरू झालेल्या उत्पादन प्रोत्साहन योजना (PLI) नंतर ॲपलच्या विक्रेत्यांनी 1,65,000 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. ॲपलच्या या निर्णयामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला मोठा चालना मिळणार असून देशातील युवकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Back to top button