भारतातील Apple Store मधील कर्मचाऱ्यांना मिळतो ‘इतका’ भरघोस पगार | आवश्यक आहे ‘ही’ शैक्षणिक पात्रता

मुंबई | भारतातील पहिल्या दोन अ‍ॅपल स्टोअर्सचे नुकतेच दिमाखदार लाँचिंग झाले. अ‍ॅपलचे भारतातील पहिले स्टोअर हे मुंबईतील जिओ वर्ल्ड मॉलमध्ये सुरु झाले आहे तर दुसरे दिल्लीतील साकेतमध्ये सुरु झाले आहे. आता या आउटलेट्समधील कर्मचाऱ्यांबद्दल अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा अ‍ॅपल स्टोअरबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

अ‍ॅपल (Apple) ही सुरुवातीपासूनचं महाग प्रोडक्ट्स असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे स्मार्टफोन, लॅपटॉप वापरणे हे भारतात एक स्टेटस सिंबल मानले जाते. भारतात Apple प्रोडक्टची वाढती मागणी पाहता मुंबई आणि दिल्लीमध्ये कंपनीने आपले अलिशान स्टोर्स सुरु केले आहे. Apple कंपनीच्या प्रत्येक प्रोडक्टसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे कंपनी आपल्या स्टोअरमधील कर्मचाऱ्यांनाही त्याच तोडीचा पगार (apple store employee payment) देते. 

Apple Store मधील कर्मचाऱ्यांचे शिक्षण किती?

अ‍ॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमबीए, एमटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, बीटेक, रोबोटिक्स सारख्या डिग्री आहेत,असे एका अहवालातून समोर आले आहे. यातील काही कर्मचारी हे परदेशातील विद्यापीठांमधून डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेऊन आलेले आहेत. तर काही कर्मचाऱ्यांना युरोपियन देशांमधून आणण्यात आले आहे.

Apple Store कर्मचाऱ्यांना येतात २५ हून अधिक भाषा

Apple ने भारतातील या दोन स्टोअरमध्ये जवळपास १७० हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भारतातील Apple Store मध्ये काम करणारे कर्मचारी केवळ पदवीच्या बाबतीतच पुढे नाहीत, तर त्यांना भाषांचेही उत्तम ज्ञान आहे. मुंबईतील Apple Store मध्ये काम करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांना २५ हून अधिक भाषा येतात, तर दिल्लीतील स्टोअरमध्ये कर्मचारी १५ वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि समजतात.

Apple Store मधील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार किती? (apple store employee payment)

मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅपल भारतातील स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान एक लाख रुपये पगार देते. म्हणजेच जवळपास सर्व कर्मचाऱ्यांना किमान १२ लाखांचे वर्षाचे पॅकेज मिळते.

Apple Store मधील कर्मचाऱ्यांना मिळतात हे फायदे

अ‍ॅपल आपल्या स्टोअर मधील कर्मचाऱ्यांना आरोग्य आणि स्वास्थ्य योजना, शिक्षणासाठी शिकवणी शुल्क आणि अ‍ॅपल उत्पादनं खरेदी करण्यासाठी सवलत मिळते. याशिवाय कर्मचाऱ्यांना पगारी रजाही मिळते.

Recent Articles