मुंबई | गेल्या काही दिवसांपासून AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence Career) आणि डेटा सायन्स (Data Science) हे अभ्यासाचे आधुनिक क्षेत्र निर्माण झाले आहे. यामध्ये सांख्यिकी, संज्ञात्मक विज्ञान, संकलन आणि माहिती विज्ञान यांसारख्या विविध विभागांमधल्या वैज्ञानिक पद्धती, प्रक्रिया आणि तंत्रांचा वापर केला जातो. विविध ठिकाणी विखुरलेल्या डेटामधून उपयुक्त माहिती एकत्रित जमा करून ती उत्तम पध्दतीने संकलित करण्याचे काम या क्षेत्रात केले जाते.
Artificial Intelligence Career
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, असा कयास लावला जात होता. तसेच काही दिग्गज आयटी कंपन्या आणि आयटी उद्योग क्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी यासारख्या तंत्रज्ञानावर बंदी आणण्याची देखील मागणी केली आहे मात्र ब्लुमबर्गनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (Artificial Intelligence Career) अनेक नवीन संधी निर्माण होणार असून यातील जाणकारांना त्याचा फायदा होईल, असे म्हणटले आहे.
AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) मधून चांगले परिणाम मिळविण्यासाठी आणि कंपन्यांना त्यांच्या कामगारांना टूल्सचा वापर करण्यास प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी “तज्ज्ञ अभियंत्यांची गरज भासणार आहे. या अभियंत्यांना 3,35,000 डॉलरपर्यंत पगार मिळू शकतो, असही ब्लुमबर्गने म्हटले आहे.
जॉन मॅककार्थी (John McCarthy) यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच एआय हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोण शिकू शकते?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करण्यासाठी संगणक आणि गणित विषय अनिवार्य आहेत. कॉम्प्युटर सायन्सचे पदवीधर उमेदवारही या क्षेत्रात काम करु शकतात. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाद्वारे सॉफ्टवेअर अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, प्रोग्रामर, गेमिंग क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्यासाठी ‘हे’ कोर्सेस महत्वाचे
कॉम्प्युटर सायन्स, आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्राम, पीजी प्रोग्राम इन मशीन लर्निंग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करण्यासाठी मुख्य कोर्स आहेत.