पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी! बँक ऑफ बडोदा मध्ये 42 रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी | Bank of Baroda Recruitment

आयटी क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Recruitment) एकूण 42 रिक्त जागांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. बॅंक ऑफ बडोदामधील ही भरती आयटी विभागासाठी करण्यात येणार आहे. असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. ‘स्टडी कॅफे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बँक ऑफ बडोदामधील ही नोकरभरती करारपद्धतीने केली जाणार आहे. बँकेनं अधिकृत सूचनेद्वारे त्याबाबत माहिती दिली आहे. सीनिअर क्वालिटी असिस्टंट लीड 2, क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर 2, ज्युनिअर क्वालिटी अ‍ॅश्युरन्स इंजिनिअर 2, सीनिअर डेव्हलपर-फुल स्टॅक जावा 14, डेव्हलपर-फुल स्टॅक जावा 6, डेव्हलपर-फुल स्टॅक डॉट नेट, जावा 6, सीनिअर डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट 2, डेव्हलपर-मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट 6, सीनिअर UI/UX डिझायनर 1, UI/UX डिझायनर 1. ही पदे या अंतर्गत भरली जाणार आहेत.

या पदभरतीसाठी वयोमर्यादा वेगवेगळी असून अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.ई. किंवा बी.टेक. झालेले असणे गरजेचे आहे. (Bank of Baroda Recruitment)

बँकेच्या www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 29 मे 2023 ही अंतिम तारीख आहे.

Recent Articles