BCCL Recruitment | भारत कोकिंग कोल लिमिटेड येथे नोकरीची संधी; ७७ रिक्त जागांची भरती | अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत ज्युनियर ओव्हरमॅन पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 27 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (P&IR), भारत कोकिंग कोल लिमिटेड, कोयला भवन, कोयला नगर, पोस्ट- BCCL टाउनशिप, धनबाद, झारखंड, पिन- 826005 असा आहे. (BCCL Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
ज्युनियर ओव्हरमॅन / ज्युनियर ओव्हरमॅन, टेक. आणि सुप. Gr-‘C’ –
01) 03 वर्षे कालावधीचा खाण अभियांत्रिकीमधील डिप्लोमा किंवा खाण अभियांत्रिकीची पदवी किंवा केंद्र सरकारच्या वतीने मंजूर केलेली इतर समकक्ष पात्रता. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून .
02) ओपन कास्ट (OC) आणि भूमिगत (UG) दोन्ही खाणींमध्ये काम करण्यासाठी कोळसा खाणी नियमन 2017 अंतर्गत खाण सुरक्षा महासंचालनालय (DGMS) द्वारे जारी केलेले वैध ओव्हरमॅनशिप सक्षमता प्रमाणपत्र (अ-प्रतिबंधित).
03) डीजीएमएसने जारी केलेले वैध गॅस चाचणी प्रमाणपत्र.
04) वैध प्रथमोपचार प्रमाणपत्र.

वेतनमान –
ज्युनियर ओव्हरमॅन / ज्युनियर ओव्हरमॅन, टेक. आणि सुप. Gr-‘C’ – 31,852/- रुपये.

अधिकृत वेबसाईट – www.bcclweb.in  (BCCL Recruitment)
PDF जाहिरातhttps://workmore.in/BCCL.pdf

Recent Articles