Career
मुंबई महानगरपालिकेत लिपीक पदांची मेगाभरती; 1846 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | BMC Clerk Bharti 2024
मुंबई | बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) कार्यकारी सहायक (लिपिक) पदांच्या एकूण 1846 जागा भरण्यासाठी (BMC Clerk Bharti 2024) अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र असलेले उमेदवार 09 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्वाची माहिती: BMC Clerk Bharti 2024
- पद: कार्यकारी सहायक (लिपिक)
- जागा: 1846
- शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात पहा)
- नोकरी ठिकाण: मुंबई
- वयोमर्यादा:
- अराखीव (खुला) प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
- अर्ज शुल्क:
- अराखीव: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट: https://www.mcgm.gov.in/
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी सहायक (लिपिक) | (1) (i) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा. आणि (ii) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. किंवा (ⅲ) ज्या मान्यताप्राप्त विद्यापिठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापिठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन, सदर टक्केवारी 45% गुर्णासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.2)उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. 3)उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.4) (i) उमेदवाराजवळ ‘एम.एस.सी.आय.टी’ परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय केलेल्या संगणक /माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचानलयाने यासंदर्भात यापुढे वेळोवेळी निर्गमित केलेल्या व बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलात आणलेल्या परिपत्रकातील तरतुदी लागू होतील. (ii) उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, खेडशिट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ई-मेल आणि इंटरनेट इत्यादीविषयी उत्तम ज्ञान असावे. |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी सहायक (लिपिक) | Rs 25,500/- to 81,100/- |
अर्ज कसा करायचा:
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जात सर्व आवश्यक माहिती द्यावी, अन्यथा अर्ज नाकारला जाईल.
कोण करू शकते अर्ज:
या पदांसाठी पात्रता मापदंड मूळ जाहिरातीत नमूद केलेले आहेत. उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
अधिक माहिती:
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली PDF जाहिरात पहावी.
Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
Official Website | Official Website |