पदवीधरांसाठी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘लिपिक’ पदांची भरती; तब्बल 1218 रिक्त जागा, 69,000 पगार | BMC Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेतील महानगरपालिका मुख्य लेखा परीक्षक, महानगरपालिका चिटणीस व महानगरपालिका आयुक्त (BMC Recruitment) यांच्या अखत्यारितील सर्व खात्यांमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम – लिपिक) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 1178 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे. अर्ज शुल्क खुला प्रवर्गाकरिता Rs. 1000 तसेच मागासप्रवर्गाकरिता Rs. 900 आहे.

शैक्षणिक पात्रता –
कार्यकारी सहायक –
1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. (BMC Recruitment)
3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

वेतनश्रेणी –
कार्यकारी सहायक –
वेतनश्रेणी (सुधारित) – M13 रु. 21,700 69,100
वेतनश्रेणी (असुधारित) – 5200 – 66666 + 2000 (BMC Recruitment)

image 61

अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/qGITW

Recent Articles