सीमा रस्ते संघटना (BRO) अंतर्गत 466 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | BRO Bharti 2024
मुंबई | सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध रिक्त पदांच्या 466 रिक्त जागा भरण्यात (BRO Bharti 2024) येणार आहेत. याबाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.
- पदाचे नाव – चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर
- पदसंख्या – 466 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरातीत दिलेल्या पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळविण्यात येईल
- अधिकृत वेबसाईट – www.bro.gov.in
पदाचे नाव | पद संख्या |
चालक यांत्रिक वाहतूक | 417 पदे |
ड्राफ्ट्समन | 16 पदे |
पर्यवेक्षक | 02 पदे |
टर्नर | 10 पदे |
मशीनिस्ट | 01 पदे |
ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री | 18 पदे |
ड्रायव्हर रोड रोलर | 02 पदे |
या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल. कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही. फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process
- Written Exam
- Physical Efficiency Test
- Practical / Trade Test
- Medical Standards
- Document Verification
BRO Vacancy details 2024
PDF जाहिरात | Border Roads Organization Bharti 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.bro.gov.in |