‘या’ विविध क्षेत्रात होणार बंपर भरती, सणासुदीमुळे वाढली कर्मचाऱ्यांची मागणी | Recruitment 2023

मुंबई | देशाच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्याही सज्ज झाल्याचे दिसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सणासुदीपूर्वीच हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी 7 लाखांपेक्षा जास्त हंगामी कामगारांची भरती (Recruitment) होण्याची अपेक्षा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा त्यात 75 टक्के एवढी मोठी वाढ हाेण्याचा अंदाज आहे.

श्रावण महिना सुरू होताच देशात सणासुदीचे दिवस सुरू होतात. गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या निमित्ताने देशभरात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यंदा लॉजिस्टिक, वेअर हाऊसिंग, डिलिव्हरी इत्यादी क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण (Recruitment) वाढणार आहे. सणासुदीचा अंदाज घेऊन कंपन्या चांगल्या पगारासह 4-5 पट इन्सेंटिव्हदेखील देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

आयटी क्षेत्रात बंपर भरतीचा अंदाज

गेल्यावर्षीपासून आयटी क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ आली होती. यावेळी मात्र आयटी आणि टेक कंपन्या डिसेंबर तिमाहीपर्यंत बंपर भरती करतील, असा अंदाज आहे. IT Sector मध्ये 44 टक्के नोकर भरती वाढेल, असा अंदाज मॅनपॉवर एम्प्लॉयमेंट आऊटलूकच्या सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे.

ई-कॉमर्स , सप्लाय चेनमध्ये कर्मचाऱ्यांची मागणी अधिक

ई- कॉमर्स क्षेत्रात डिलिव्हरीसाठी कर्मचाऱ्यांची मागणी 40 टक्क्यांनी वाढली आहे. या क्षेत्रातील तसेच लॉजिस्टिक कंपन्या हजारोंच्या संख्येने हंगामी कर्मचारी भरती करत आहेत. त्यात बहुतांश नियुक्त्या कंत्राटी पद्धतीने होतील, असे तज्ज्ञांनी सांगितले.
यामध्ये 7 ते 8 लाख नोकऱ्या पार्टटाईम, तात्पुरत्या आणि हंगामी कर्मचाऱ्यांना मिळू शकतात. सध्या यातील 23 टक्के भरती झालेली आहे. 4 लाख लोकांना मागील वर्षी 2022 मध्ये हंगामी स्वरूपाच्या नोकऱ्या मिळाल्या हाेत्या. हे प्रमाण 20 ते 25 टक्के इतके होते.

यंदा ई-कॉमर्स क्षेत्रात विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. जवळपास 69 टक्के कंपन्या अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात. 20 टक्के कंपन्या हंगामी कर्मचाऱ्यांना नियुक्त करतील. तर 18 टक्के कंपन्या भरतीत डिसेंबरमध्ये वाढ करू शकतात.

या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची मागणी वाढली

वेअर हाऊसिंग क्षेत्रात 15 टक्के कर्मचाऱ्यांची मागणी वाढली.
डिलिव्हरी क्षेत्रातील 40 टक्के कर्मचाऱ्यांच्या मागणीत झाली आहे.
लॉजिस्टिक क्षेत्रात 40 टक्के हंगामी कर्मचाऱ्यांची मागणी वाढणार आहे.
सध्या 64 हजार लोकांना ब्रॅंडेड रिटेल कंपन्यांनी यावर्षी नोकरी दिली आहे.

Recent Articles