टायपिंग येतय? मग 63 हजार पगाराची सरकारी नोकरी तुमचीच; 1778 पदांची मेगाभरती | Govt Jobs

मुंबई | सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी गुजरात हाईकोर्टात असिस्टंट पदांसाठी नोकरीची (Govt Jobs) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरती अंतर्गत तब्बल 1778 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे.

गुजरात हायकोर्टातील या पदभरतीसाठी पदवीधर उमेदवार गुजरात हाईकोर्टच्या ऑफिशियल वेबसाइट gujaratighcourt.nic.in वरून थेट अर्ज (Govt Jobs Apply) करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे. अर्ज ऑनलाइन पध्दतीने करायचा असून इतर पध्दतीने केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

शैक्षणिक पात्रता
उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून पदवी धारण केलेला असावा. तसेच उमेदवारास टाइपिंग स्पीड 5000 की डिप्रेशन असली पाहिजे आणि संगणक ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदभरतीसाठी 21-35 वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षण प्रवर्गानुसार वयात नियमानुसार सवलत.

निवड प्रक्रिया आणि वेतन
अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड पूर्व परिक्षा, मुख्य परिक्षा आणि टाइपिंग स्पीड यामधून केली जाईल. पूर्व परिक्षा 25 जून तर मुख्य परिक्षा ऑगस्ट महिन्यात घेण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 इतका मासिक पगार मिळेल.

पदभरतीसाठी अधिकृत लिंक
gujarathighcourt.nic.in

Recent Articles