मुंबई | नोकरीच्या शोधात असलेल्या लाखो बेरोजगार तरुणांसाठी (Career In Digital Marketing) आकर्षक पगारासह नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बेरोजगार तरुणांना डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करून नवी सुरुवात करण्याची संधी आहे. यामध्ये सोशल मीडिया मॅनेजर, कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट, एसइओ स्पेशालिस्ट, मार्केटिंग अॅनालिस्ट अशा पदांना मागणी आहे.
पे पर क्लिक एक्सपर्ट –
आजच्या काळात जवळपास सर्वच वेबसाईट (Career In Digital Marketing) पीपीसीच्या माध्यमातून त्यांचे ट्रॅफिक वाढवतात. पीपीई तज्ञांना दरमहा सुमारे ४५ ते ५० हजार रुपये पगार मिळतो.
कम्युनिकेशन स्किल्स –
ऑनलाइन मार्केटिंग क्षेत्रात ई-मेल, मेसेजद्वारे चांगल्या संवादाने तुम्ही कंपनी आणि लोक यांच्यात विश्वासार्ह नाते प्रस्थापित करू शकता. कम्युनिकेशन मॅनेजरला दरमहा ६० ते ९० हजार रुपये पगार मिळतो.
कंटेट क्रिएटर –
प्रत्येक कंपनी कंटेटच्या माध्यमातून आपल्या टार्गेट कस्टमरचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न करते. (Career In Digital Marketing) उत्तम कंटेट देऊन तुम्ही दूरवरच्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता. कंटेंट क्रिएटरला सुरुवातील दरमहा सुमारे १५ ते २५ हजार रुपये पगार मिळतो.
एसईओ एक्सपर्ट-
वेबसाइट किंवा कंपनी पेजवरील तुमचा कंटेट कितीही चांगला असली तरीही एसईओ शिवाय लाखो यूजर्सपर्यंत तो पोहोचू शकत नाही. (Career In Digital Marketing) म्हणूनच आजच्या काळात प्रत्येक ब्रँडला एसईओ एक्सपर्टची गरज असते. एसईओ एक्सपर्ट्सना दरमहा साधारण २५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.
ईमेल मार्केटिंग –
आजच्या काळात डिजीटल क्षेत्रातील ईमेल मार्केटिंग हे एक उत्तम साधन आहे. ईमेलद्वारे, तुम्ही ग्राहक किंवा लोकांशी थेट संवाद साधून तुमच्या (Career In Digital Marketing) उत्पादनाची माहिती शेअर करु शकता. या क्षेत्रात तुम्हाला दरमहा ३० हजार रुपये पगार मिळतो.
मार्केटिंग ऑटोमेशन मॅनेजर –
वेबसाइट नोटिफिकेशन, एसएमएस मार्केटिंग, पॉप अप, पुश नोटिफिकेशन आणि ई-मेल मार्केटिंग द्वारे तुम्ही लोकांना तुमच्या कंपनीचे ग्राहक बनवू शकता. तुमच्या कंपनीचा सेल वाढवू शकता. मार्केटिंग ऑटोमेशन मॅनेजरला दरमहा साधारण ६० ते ९० हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो.
सोशल मीडिया मार्केटिंग –
जगातील एक तृतीयांश लोक सोशल मीडिया वापरत आहेत. मार्केटिंगसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या (Career In Digital Marketing) सोशल मीडिया मॅनेजरला सुमारे २० ते ३० हजार रुपये पगार मिळतो.