सरकारी नोकरी हवीय? मग जाणून घ्या पात्रता आणि विविध क्षेत्रातील संधी | Career In Government Sector

मुंबई | कोणत्याही शाखेतील पदवीचे तीन वर्षे पूर्ण केलेल्या युवकांना सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे. (Career In Government Sector) सरकारी नोकरीसाठी वयोमर्यादा व शिक्षणाची पात्रता विचारात घ्यावी लागते. तसंच काही परीक्षाही द्याव्या लागतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयाची किमान 21 वर्षं पूर्ण झालेली असली पाहिजेत. प्रशासकीय सेवा परीक्षांसाठी उमेदवारांचं वय 21 ते 26 इतकं असलं पाहिजे.

सरकारी परीक्षांसाठी उमेदवारांनी आधीपासूनच अभ्यास सुरू केला पाहिजे.अनेक सरकारी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या नोकरीत स्थैर्य आणि रोजगार सुरक्षिततेची हमी असल्यामुळे या नोकरीला (Career In Government Sector) उमेदवार अधिक पसंती देतात. 

यूपीएससी (IES) – इंडियन इंजिनीअरिंग सर्व्हिसेस. कॉलेजच्या शेवटच्या वर्षापासूनच या परीक्षेची तयारी उमेदवारांना करावी लागते. लवकर अभ्यासाला सुरुवात केली, तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता.
बँकेची परीक्षा – फायनान्स आणि अकाउंट्समध्ये शिक्षण घेतलेले उमेदवार बँकांच्या परीक्षा देऊन त्या क्षेत्रात नोकरी मिळवू शकतात. (Career In Government Sector)
एसएससी परीक्षा – SSC अर्थात स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे पदवीस्तरीय परीक्षा घेतली जाते. सरकारी विभाग, मंत्रालय आणि सरकारी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये यात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

यूपीएससी (IAS) – भारतीय प्रशासकीय सेवा ही परीक्षा सर्वांत कठीण असते. यात केवळ उत्तीर्ण होणं महत्त्वाचं नसतं, तर रँकनुसार प्रशासकीय सेवांमध्ये काम करण्याची संधी मिळते.
डिफेन्स अँड आर्म्ड फोर्सेस परीक्षा – या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारच्या डिफेन्स आणि मिलिटरी संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळते.
रेल्वे परीक्षा – चांगल्या नोकरीची हमी हवी असेल, तर रेल्वे परीक्षा हा उत्तम पर्याय आहे.
इतर परीक्षा – प्रत्येक राज्याकडून प्रशासकीय सेवांसाठीच्या परीक्षा घेतल्या जातात. तसंच ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्युड टेस्ट इंजिनीअरिंग, एलआयसी एएओ परीक्षा या परीक्षाही उमेदवारांना देता येऊ शकतात.

नोकरीच्या संधी
बँक परीक्षा
आरबीआय ग्रेड ए अँड ग्रेड बी परीक्षा
एसबीआय पीओ परीक्षा (प्रोबेशनरी ऑफिसर)
एसबीआय क्लार्क परीक्षा (Career In Government Sector)
आयबीपीएस पीओ परीक्षा (प्रोबेशनरी ऑफिसर)
आयबीपीएस एसओ परीक्षा

एसएससी
एसएससी कम्बाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (SSC CGL)
SSC CPO परीक्षा
SSC JE परीक्षा
SSC SHSL परीक्षा

डिफेन्स
यूपीएससी सीडीएस (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस) परीक्षा
इंडियन कोस्ट गार्ड (पोस्ट असिस्टंट कमांडंट)
डायरेक्ट टेक्निकल एन्ट्री इन इंडियन आर्म्ड फोर्सेस (For BE/B.Tech Graduates)
एनसीसी स्पेशल एन्ट्री इन इंडियन आर्म्ड फोर्सेस
AFCAT (एअरफोर्स कॉमन अप्टिट्युड टेस्ट)
INET (इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट)
CAPF (सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस) परीक्षा (Post – CAPF Assistant Commandant)
JAG (जज अडव्होकेट जनरल) परीक्षा (Career In Government Sector)
टेरिटोरिअल आर्मी परीक्षा (ऑफिसर एन्ट्री)

रेल्वे परीक्षा
RRB ALP परीक्षा (असिस्टंट लोको पायलट)
RRB NTPC परीक्षा (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज)
RRB JE परीक्षा (ज्युनिअर इंजिनीअर) (Career In Government Sector)
RRB MI परीक्षा (मिनिस्टेरिअल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज)
RRB पॅरामेडिकल परीक्षा

Recent Articles