‘या’ क्षेत्रात दुप्पट पगार देण्यास कंपन्या तयार, पण कर्मचारीच मिळेनात; तब्बल 51% पदे रिक्त | Career News

मुंबई | सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) बोलबाला (Career News) सुरू आहे. यामुळे गुगल आणि अॅपलपासून प्रत्येक लहान-मोठी कंपनी एआय टूल्स विकसित करण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतत आहे. यामुळे जगभरात AI तज्ञ अभियंत्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

भारतही या स्पर्धेपासून लांब नाही. नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज् म्हणजेच NASSCOM म्हणते की, भारतात गरजेपेक्षा तब्बल 51 टक्के AI अभियंते कमी (Career News) आहेत. देशात सध्या 4.16 लाख AI अभियंते असून आणखी 2.13 लाख अतिरिक्त AI अभियंत्यांची गरज आहे.

नॅसकॉमच्या मते, जगातील एआय टॅलेंटमध्ये 16 टक्के वाटा असलेल्या, अमेरिका आणि चीनसह भारत जगातील तीन टॉप टॅलेंट मार्केटमध्ये आहे. अत्यंत कुशल AI, मशीन लर्निंग आणि बिग डेटा टॅलेंटचा जगातील दुसरा सर्वात मोठा वाटा भारताचा आहे.

भारताला जागतिक तंत्रज्ञान उद्योगाचे बॅक ऑफिस मानले जाते. पण भारतालाही ही मागणी-पुरवठ्यातील तफावत भरून काढता येणे सध्याच्या घडीला तरी शक्य दिसत नाही.
Google, Baidu आणि Microsoft सह जवळजवळ प्रत्येक टेक कंपनी AI इंजिन बनवण्यात गुंतलेली आहे. याचा परिणाम म्हणजे सिलिकॉन व्हॅलीपासून बंगळुरूपर्यंत एआय इंजिनिअर्सची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांत, काही टेक कंपन्यांनी मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना काढून टाकले असले तरी AI मध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांवर याचा परिणाम झालेला नाही. त्यांची मागणी सातत्याने वाढतानाच दिसत आहे.

सध्याचा परिस्थितीचा विचार करून अनेक कंपन्या दुप्पट पगार देऊन AI अभियंत्यांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराची चांगली संधी असून त्याचा पुरेपुर फायदा उचलणे गरजेचे आहे.

Recent Articles