नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
इलेक्ट्रिशिअन, फिटर, मेकॅनिक डिझेल, कोपा, मशिनिस्ट, टर्नर, सचिवीय सहाय्यक, अकाउंटंट/लेखा कार्यकारी, वेल्डर, सर्वेक्षण, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी), दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वायरमन, मल्टी-मीडिया आणि वेबपृष्ठ डिझायनर, मेकॅनिक वाहनाची दुरुस्ती आणि देखभाल, मेकॅनिक अर्थ मूव्हिंग मशीनरी पदाच्या 608 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 18 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. (CCL Recruitment)
वेतनमान – 6,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
अधिकृत वेबसाईट – www.centralcoalfields.in