सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी | Central Bank Of India Recruitment

मुंबई | बँकिंग क्षेत्रात जॉब शोधणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने नोकरीची (Central Bank Of India Recruitment) संधी उपलब्ध करून दिली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियात काउन्सेलर/ एफएलसीसी इन्चार्ज फॅकल्टी आणि ऑफिस असिस्टंट ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता 25 मे 2023 पर्यंत मुदत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया काउन्सेलर/ एफएलसीसी इन्चार्ज फॅकल्टी आणि ऑफिस असिस्टंट या पदांसाठी स्केल -II आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक अथवा एसबीआयमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, ही पदे एक वर्षाकरिता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरण्यात येणार आहेत. (Central Bank Of India Recruitment)

अधिसूचनेनुसार, काउन्सेलर अर्थात समुपदेशक पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराने यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच अ‍ॅग्रीकल्चर फायनान्स ऑफिसर / रूरल डेव्हलपमेंट ऑफिसर / बँकिंगच्या मुख्य प्रवाहातील अ‍ॅग्रीकल्चर ऑफिसर / लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर आणि फॅकल्टी लीडर्स / ट्रेनिंग सेंटर्सचे फॅकल्टी मेंबर्स / महाविद्यालयात रुरल डेव्हलपमेंट शिकवण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

फॅकल्टी या पदासाठी इच्छुक उमेदवाराने पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. रुरल डेव्हलपमेंटमध्ये एमएसडब्लू/एमए, समाजशास्त्र, मानस शास्त्रात एमए किंवा बीएस्सी अॅग्री पदवी मिळवलेली असावी. बीएससी बीएड केलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करू शकतात.

अधिकारी म्हणून कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त बँक अधिकारी, वर नमूद पात्रता असलेले प्राध्यापक, ग्रामीण विकासात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

ऑफिस असिस्टंट या पदासाठी इच्छुक उमेदवार बीएसडब्लू/बीए/बीकॉम झालेला असावा. तसेच त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान असावं. अकाउंट आणि बुक किपिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या पदासाठी प्राधान्य दिलं जाईल.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिसूचनेनुसार, काउन्सेलर आणि फॅकल्टी पदासाठी इच्छुक उमेदवाराचं कमाल वय 65 वर्षं असावे. ऑफिस असिस्टंट पदासाठी इच्छुक उमेदवाराचे कमाल वय 35 वर्षापर्यंत असावे. नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाईल. हा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीव्दारे केली जाईल. या संदर्भातील योग्य तपशील योग्यवेळी निवडलेल्या उमेदवारांना कळवला जाईल.

इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरावा. त्यावर कॉन्ट्रक्टवरील एफएलसीसीचे इन्चार्ज/ काउन्सेलर या पदासाठी भरती अर्ज असे नमूद करावे. त्यानंतर पूर्ण भरलेला अर्ज द रिजनल मॅनेजर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिजनल ऑफिस कटिहार, पहिला मजला, साह काटरा, न्यू मार्केट, जिल्हा-कटिहार, बिहार – 854105 या पत्त्यावर 25 मे 2023 पूर्वी पाठवावा.

Recent Articles