मुंबई | पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India Recruitment) सुमारे 5000 अॅप्रेंटिसच्या जागा भरण्यात येत आहेत. या पदभरतीची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये होणारी ही पदभरती विविध राज्यांमधील शाखांसाठी केली जाणार असून यामध्ये महाराष्ट्रातील 629 पदांचा समावेश आहे.
अॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी घेतलेली असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेचा समकक्ष पदवीधर असावा. या पदासाठी (Central Bank of India Recruitment) किमान वयोमर्यादा 20 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे.
- पदाचे नाव – बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर
- पदसंख्या – 5000 जागा
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर (मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
- अर्ज शुल्क –
- PWBD उमेदवार – Rs.400/-+GST
- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/सर्व महिला उमेदवार – Rs.600/-+GST
- इतर सर्व उमेदवार – Rs. 800/-+GST
- अर्ज पद्धती -ऑनलाईन (नोंदणी)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2023
- अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
PDF जाहिरात | shorturl.at/fkmxN |
ऑनलाईन नोंदणी करा | shorturl.at/nvOS5 |
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाइन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांना https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
- उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतात.
- शिकाऊ उमेदवारीसाठी यशस्वीरित्या अर्ज केल्यानंतर सर्व अर्जदारांना परीक्षा शुल्क भरण्यासाठी बँक तपशील असलेला BFSI SSC कडून ईमेल प्राप्त होईल.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अप्रेटिंस पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा (ऑब्जेटिव्ह टाइप), मुलाखत आणि लोकल लॅग्वेज प्रुफ (Central Bank of India Recruitment) याद्वारे केली जाणार आहे. या पदासाठी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येईल. ग्रामीण किंवा निमशहरी शाखेकरिता निवड झालेल्या उमेदवारास 10,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल. शहरी भागातील शाखांकरिता निवड झाल्यास 15,000 रुपये तर मेट्रो शहरातील शाखांमध्ये निवड झाल्यास 20,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 2023 अॅप्रेंटिस पदभरती अंतर्गत
गुजरातमध्ये 342
दादरा नगर हवेली आणि दीव-दमणमध्ये 3,
मध्य प्रदेशात 502
छत्तीसगडमध्ये 134
चंडीगडमध्ये 43
हरियाणा 108,
पंजाब 150
जम्मू-काश्मीरमध्ये 26
हिमाचल प्रदेशात 63
तमिळनाडूत 100
पुद्दुचेरीत 1
केरळमध्ये 136
राजस्थानमध्ये 192
दिल्लीत 141
आसाममध्ये 135
मणिपूरमध्ये 9
नागालँडमध्ये 7
अरुणाचल प्रदेशात 8
मिझोराममध्ये 2
मेघालयमध्ये 8
त्रिपुरात 4
कर्नाटकात 70
तेलंगणात 106
आंध्र प्रदेशात 141
उडिशा 112
पश्चिम बंगाल 362
अंदमान – निकोबार 1
सिक्कीम 16
उत्तर प्रदेश 615
गोव्यात 44
महाराष्ट्र 629
बिहारमध्ये 526
झारखंडमध्ये 46 पदं भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी बँकेची अधिकृत नोटिफिकेशन वाचावं.