पदवीधरांना परराष्ट्र मंत्रालयात 10 लाख रुपयांपर्यंत पगाराची नोकरी; लगेच करा अप्लाय | Central Government Job

मुंबई | केंद्र सरकारची नोकरी म्हणटले की त्याचे वेगळेच वलय समाजात असते. अशाच नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत (Central Government Job) उपलब्ध झाली आहे. ‘स्टडी कॅफे’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने कन्सल्टंट पदासाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवाराला वार्षिक 10 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. या नोकरीचा (Central Government Job) कार्यकाळ एक वर्षासाठी आहे. 20 एप्रिल 2023 पासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या पदासाठी अवश्य अर्ज करावेत.

कन्सल्टंट या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 11.05.2023 रोजी 25 ते 40 वयोगटातील असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11.5.2023 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. निवडलेल्या उमेदवारांना 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न मिळेल व टॅक्स डिडक्शनची सुविधा मिळेल. या नोकरीसाठी हाउस रेंट अलाउन्स दिला जाणार नाही.

संबंधित पदावर 1 वर्षाच्या कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. परंतु आवश्यकता आणि कार्यक्षमतेनुसार कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. पोस्टिंगचं ठिकाण परराष्ट्र मंत्रालय (साउथ ब्लॉक/जवाहरलाल नेहरू भवन/सुषमा स्वराज भवन/पटियाला हाउस/ISIL बिल्डिंग/अकबर भवन), नवी दिल्ली असेल.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज – अंडर सेक्रेटरी (PF&PG), मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, रूम नंबर 4071, जवाहरलाल नेहरू भवन, 23-डी, जनपथ, नवी दिल्ली-110011 या पत्त्यावर अंतिम तारखेपर्यंत किंवा त्या पूर्वी पाठवावे.

अर्जदारांची माहिती असलेल्या लिफाफ्यावर “Application for the position of Consultant in PP&R Division of Ministry of External Affairs” असे लेबल असावे. असे लेबल नसल्यास कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

अधिकृत वेबसाईट – https://mea.gov.in/

अधिक माहितीसाठी

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी भारतातील किंवा परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरेजेचे आहे. उमेदवाराला विशेष डोमेन नॉलेज, ओरिजनल थिंकिंग, एव्हिडन्स ऑफ कंटेंट रायटिंग, रिव्ह्यूड पब्लिकेशन्स, जर्नल्स, वर्तमानपत्रे, माध्यमे, रिपोर्ट्स याबद्दल ज्ञान असावे. प्रतिष्ठित विद्यापीठातील कामाचा अनुभव, आंतरराष्ट्रीय घडामोडी, सार्वजनिक धोरणांमध्ये रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा थिंक-टँकचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच लेखन आणि प्रेझेंटेशन स्कील्समध्ये विस्तृत अनुभवाचा पुरावा दिल्यास उत्तम.

Recent Articles