मुंबई | देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्येही तब्बल ९.७९ लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत नोकरीसाठी भरतीची (Central Government New Job Openings) तयारी करणाऱ्या तरुणांना या पदांवर नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे.
Central Government New Job Openings
या पदांच्या भरतीसाठी लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या ९.७९ लाखांहून अधिक असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय रेल्वेत सर्वाधिक पदे रिक्त आहेत. भारतीय रेल्वेमध्ये एकूण २.९३ लाख पदे रिक्त आहेत. (Central Government New Job Openings)
ही रिक्त पदे भरण्याचे काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि संस्था आवश्यक कर्मचाऱ्यांच्या संख्येसाठी नियुक्त्या करत आहेत. जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले की, सरकारने सर्व मंत्रालये/विभागांना रिक्त पदे भरण्यासाठी आधीच सूचना दिल्या आहेत. भारत सरकारकडूनही रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. रोजगार निर्मितीसाठी उत्प्रेरक म्हणूनही याकडे पाहिले जात आहे.
कोणत्या विभागात किती रिक्त पदे आहेत?
भारतीय रेल्वे व्यतिरिक्त रिक्त पदांच्या बाबतीत दुसरा क्रमांक संरक्षण (सिव्हिल) विभागाचा आहे. संरक्षण (सिव्हिल) मध्ये रिक्त पदांची संख्या २.६४ लाख आहे. यानंतर गृह विभागांतर्गत १.४३ लाख पदे रिक्त आहेत. यानंतर, महसूल विभागात ८०,२४३ पदे आणि इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स विभागात २५,९३४ पदे रिक्त आहेत. तर एटोमिक एनर्जी विभागात रिक्त पदांची संख्या ९,४६० आहे.
कधी होणार या पदांवर नियुक्त्या?
या पदांवरील नियुक्तीसाठी सातत्याने भरती मोहीम राबविण्यात येत असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. विविध विभागांमध्ये रिक्त पदांसाठी सातत्याने भरती सुरू आहे. वर्षभरात १० लाख रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्टही सरकारने ठेवले आहे. अशा परिस्थितीत येत्या वर्षभरात सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये भरतीसाठी सातत्याने अधिसूचना जारी होतील, अशी अपेक्षा आहे.
सीबीआयमध्ये एक हजाराहून अधिक पदे रिक्त
सीबीआयला मंजूर करण्यात आलेल्या एकूण ५५३२ पदांपैकी ४५०३ पदे भरण्यात आली. अद्यापही १०२९ पदे रिक्त असल्याची माहिती गुरुवारी राज्यसभेत देण्यात आली. कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे. रिक्त पदे भरण्यासाठी सीबीआयने पावले उचलली आहेत, कार्यकारी श्रेणीतील बहुसंख्य पदे रिक्त आहेत, कार्यकारी श्रेणीसाठी पाच हजार पदे मंजूर करण्यात आली त्यापैकी ४,१४० पदे भरण्यात आली आहेत.