Chandrapur Mahanagarpalika Recruitment | चंद्रपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागांची भरती; ७५,००० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चंद्रपूर शहर महानगरपालिका – मनपा (Chandrapur Mahanagarpalika Recruitment) एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण संस्था, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान करीता नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट आणि ANM पदाच्या 25 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 25 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभाग असा आहे. (Chandrapur Mahanagarpalika Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS
मायक्रोबायोलॉजिस्ट – MBBS with MD Microbiology from an institute recognized by the Medical Council of India
एपिडेमियोलॉजिस्ट – Any Medical Graduate with MPH / MHA / MBA in Health
ANM – १० वी उत्तीर्ण व ए.एन.एम. कोर्स शासन मान्य संस्थेमधून उत्तीर्ण अनुभव असल्यास प्राधान्य.

वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- per month
मायक्रोबायोलॉजिस्ट – Rs. 75,000/- per month
एपिडेमियोलॉजिस्ट – Rs. 35,000/- per month
ANM – Rs. 18,000/- per month

image 50

अधिकृत वेबसाईटcmcchandrapur.com

Recent Articles