CIPET Recruitment | CIPET अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी अंतर्गत नोकरीची (CIPET Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत व्याख्याता (प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान), प्रशिक्षक (कौशल्य विकास) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 12 जून 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता संचालक आणि प्रमुख CIPET:CSTS, Plot No-A, IDCO, Bampada Industrial Area, and Balaosre – 756056 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
व्याख्याता (प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान) –
01) संबंधित विषयातील अभियांत्रिकी / तंत्रज्ञानामध्ये प्रथम श्रेणीसह पूर्ण-वेळ बॅचलर पदवी किंवा समतुल्य 02) अभियांत्रिकी / तंत्रज्ञानातील पूर्ण-वेळ पदव्युत्तर पदवी, पूर्णवेळ बॅचलर किंवा मास्टर्स स्तरावर प्रथम श्रेणी किंवा समकक्ष आवश्यक आहे 03) 01 वर्षे अनुभव. (CIPET Recruitment)
प्रशिक्षक (कौशल्य विकास) –
पूर्णवेळ प्रथम श्रेणी योग्य / संबंधित विषयात बी.ई. / बी.टेक., किमान 01 वर्षे अनुभव

वेतनमान – 25,000/- रुपये ते 35,000/- रुपये.

अधिकृत वेबसाईटwww.cipet.gov.in

Recent Articles