Collector Office Recruitment | १० वी उत्तीर्णांना जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम (Collector Office Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत वाहन चालक, शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Collector Office Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 19 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी, आस्थापना लिपीक, पुरवठा विभाग, जि.का. वाशिम असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
वाहन चालक –
उमेदवार हा भारताचा नागरीक असावा.
उमेदवारांचे वय 18 ते 45 या वयोगटातील असावा.
उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले)
उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
उमेदवारांकडे शासकीय/निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी 3 वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे. (Collector Office Recruitment)
उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक.
उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरीक क्षमता सुदृढ असावी.
उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील.
उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना क्षेत्राची भौगोलीक माहिती असणे आवश्यक आहे.
उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.

शिपाई –
उमेदवार भारताचा नागरीक असावा.
उमेदवार हा इयत्ता 10 उत्तीर्ण असावा.
उमेदवाराचे वय 18 वर्ष पुर्ण व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. (अंशकालीन कर्मचारी वगळून) (Collector Office Recruitment)
सदरची नियुक्ती हि तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपाची असुन 11 महिन्या करीता राहील.
उमेदवारांना मराठी, हिंदी भाषा बोलता व इंग्रजी भाषा वाचण्याचे ज्ञान आवश्यक.

वेतनश्रेणी –
वाहन चालक – नियुक्त उमेदवारांस 11200/- इतके ठोक मानधन देण्यात येईल.
शिपाई – उमेदवाराला 9500/- रु. इतके ठोक मानधन देण्यात येईल.

अधिकृत वेबसाईटwashim.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/lsC19

Recent Articles