Dell Career | जगप्रसिध्द कंपनीसोबत IT क्षेत्रात नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

मुंबई | माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या डेल टेक्नॉलॉजिज कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती (Dell Career) केली जात आहे. या पदभरती अंतर्गत डेल कंपनी प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर, सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर आणि सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर – बिऑस ऑटोमेशन या पदांची भरती करणार आहे. `टेकगिग डॉट कॉम` ने याबाबत माहिती प्रकाशित केली आहे.

1) सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर – BIOS Automation
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना (Dell Career) ऑटोमेटिंग, व्हॅलिडेटिंग हार्डवेअर, सॉफ्टवेअर सिस्टीम आणि व्यापक उपाययोजनांसाठी पद्धतींशी संबंधित डिझाइन आणि विकास अ‍ॅक्टिव्हिटीजे काम पहावे लागेल. ऑटोमेटिंग UEFI FW आणि त्याच्या फीचर्सच्या टेस्टिंगची जबाबदारी, प्रोग्रामचं नियोजन आणि प्रमाणीकरणाच्या टप्प्यांदरम्यान सर्व सॉफ्टवेअर आणि UEFI FWशी संबंधित समस्यांची जबाबदारी सांभाळावी लागेल. 

निवड झालेल्या उमेदवाराला पुढच्या पिढीच्या उत्पादनांवर आणि अनुभववृद्धीसाठी (Dell Career) जगभरातल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या उत्तम क्लायंट्ससोबत काम करायची संधी मिळेल. याशिवाय फीचर्सची गरज समजून घेणे, आर्किटेक्चर आणि डिझाइन UEFI FW टेस्टिंग, UEFI FW कोड डिबगिंग, सीपीयू, पीसीएच, एफडब्लू, ओएससारख्या एचडब्लू आणि एसडब्लू सर्व्हरवर UEFI FW ची टेस्ट घेणे यांसारख्या जबाबदाऱ्या असतील. तसेच या पदावरील उमेदवारांला करंट व्हॅलिडेशन शेड्यूल्स, टाइमलाइन आणि डेव्हलपमेंट स्टेटस विकसित करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी आणि या संदर्भात टीमसोबत कम्युनिकेशन करण्याचे काम करावे लागेल.

2) सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर – 
या पदासाठी उमेदवाराकडे ऑटोमेटिंग, व्हॅलिडेटिंग हार्डवेअर, सॉफ्टवेअर सिस्टिम आणि व्यापक उपाययोजनांसाठी पद्धतींशी संबंधित डिझाइन आणि विकास अ‍ॅक्टिव्हिटीजचे ज्ञान असावे. क्लायंट प्रॉडक्ट ग्रुप या टीमवर एंटरप्राइझ क्लायंट व्यवसायासाठी (उदा. लॅपटॉप, वर्कस्टेशन्स, डेस्कटॉप आदी.) व्यवस्थापनक्षमता सॉफ्टवेअर तयार करण्याची आणि वितरित करण्याची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता असावी.

निवड झालेल्या उमेदवारांला UEFI FW आणि त्याच्या फीचर्सचं ऑटोमेटिंग, टेस्टिंगची जबाबदारी सांभाळावी लागेल. प्रोग्रामचं नियोजन आणि प्रमाणीकरणाच्या टप्प्यांदरम्यान सर्व सॉफ्टवेअर आणि UEFI FW संबंधित समस्यांची जबाबदारी या व्यक्तीवर असेल. नेक्स्ट जनरेशन प्रॉडक्टवर काम करण्याची आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्वोत्तम क्लायंटसोबत अनुभव मिळवण्याची संधी या पदावरील उमेदवाराला मिळेल. फीचर्सची गरज समजून घेणे, आर्किटेक्चर आणि डिझाईन UEFI FW टेस्टिंग, UEFI FW कोड डिबगिंग, सीपीयू, पीसीएच, एफडब्लू, ओएससारख्या एचडब्लू आणि एसडब्लू सर्व्हरवर UEFI FW ची टेस्टिंग घेणे तसेच करंट व्हॅलिडेशन शेड्यूल्स, टाइमलाइन आणि डेव्हलपमेंट स्टेटस विकसित करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी आणि या संदर्भात टीमसोबत कम्युनिकेशन करण्याचे काम करावे लागेल.

सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर पदासाठी संबंधित उमेदवाराकडे पाच वर्षांपेक्षा जास्त काळाचा संबंधित कामाचा अनुभव, पायथॉन, मायक्रो पायथॉन, पर्ल यांसारख्या ऑटोमेशन लँग्वेजचा अनुभव, X86 आणि X64 आर्किटेक्चर आणि इन्स्ट्रक्शन सेटची माहिती, लिटल एंडियन x86,x64 या इंटेल आर्किटेक्चरचं ज्ञान, तसेच ARIUM वापरून टार्गेट प्लॅटफॉर्म्सवरच्या रिमोट डिबगिंगचा अनुभव असावा.

या पदावरच्या व्यक्तीने एजाइल स्क्रम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकलच्या सर्व टप्प्यांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. या पदावरच्या व्यक्तीकडे फंक्शनल रिक्वायरमेंट अ‍ॅनालिसिस, सोल्युशन डेव्हलमेंट, सेल्सफोर्स कन्फिगरेशन आणि डेव्हलमेंट, टेस्टिंग, प्रशिक्षण, उपयोजन आणि डॉक्युमेंटशन या कामांची जबाबदारी असेल.

3) प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर –
या पदासाठी इच्छुक उमेदवाराला फंक्शनल रिक्वायरमेंट अ‍ॅनालिसिस, सोल्युशन डेव्हलमेंट, सेल्सफोर्स कन्फिगरेशन आणि डेव्हलमेंट, टेस्टिंग, प्रशिक्षण, उपयोजन आणि डॉक्युमेंटशन या कामांचे ज्ञान असावे. सॉफ्टवेअर डेव्हलमेंट, फोर्स डॉट कॉम प्लॅटफॉर्म, सेल्स क्लाउड, सेल्स फोर्स सीपीक्यू, फायनान्शियल फोर्स पीएसए (प्राधान्य असेल), फ्लो, व्हिज्युअल फोर्स आणि अ‍ॅपेक्स कोडिंग याचे चांगले ज्ञान असावे. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग स्किलसोबत जावा एसई आणि ईई (जावा,जेएसएफ, एसक्यूएल) याचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास कॉम्प्लेक्स बिझनेस सिस्टीम इंटिग्रेशन आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाइन पॅटर्न आणि डेव्हलपमेंटचे ज्ञान आणि अनुभव असावा. लाइटनिंग कंपोनंट कन्फिगरेशन, अरोरा कंपोनंट, REST,JSON And XML यांसारख्या वेब सर्व्हिसेससह सेल्सफोर्स इंटिग्रेशनचा अनुभव असावा. टियर 1 मधल्या ग्राहकांच्या रिक्वेस्टला त्याने तातडीने प्रतिसाद दिला पाहिजे. तांत्रिक उत्तरे प्रदान करण्यासाठी, तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सपोर्टेड अ‍ॅप्लिकेशन्सशी संबंधित योग्य उपाय सुचवण्यासाठी उमेदवाराला ग्राहक आणि टियर 1 सपोर्ट टीमसोबत काम करता आले पाहिजे. तसेच सेल्सफोर्स कम्युनिटीला सक्षम करताना ऑपरेशनल कार्यक्षमतेसाठी ज्ञानावर आधारित पायाभूत सामग्री तयार करता आली पाहिजे.

वरील पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी Dell Career या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संबंधित पदभरतीची अधिक माहिती घ्यावी आणि अर्ज करावा. 

Recent Articles