पदवीधरांना भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात 60 हजार पगाराची संधी, त्वरित अर्ज करा | Department of Commerce Bharti 2023

मुंबई | भारत सरकार वाणिज्य विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (Department of Commerce Bharti 2023) केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

याठिकाणी यंग प्रोफेशनल, सहयोगी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2023 आहे.

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – recruitment-e2@gov.in.

शैक्षणिक पात्रता
यंग प्रोफेशनल, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार – डेटा सायन्स स्ट्रीम अंतर्गत, उमेदवाराला डेटा सायन्स/आयटी मधील अनुभव असावा. किंवा जनरल मॅनेजमेंट स्ट्रीम अंतर्गत, मार्केटिंगमध्ये एमबीए पदवी आणि मार्केटिंगचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

image 1

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर recruitment-e2@gov.in. या पत्यावर पाठवावे. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या सीव्ही आणि संबंधित कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रतीसह विहित नमुन्यात (कॉपी संलग्न) योग्यरित्या भरलेले अर्ज पाठवू शकतात.

PDF जाहिरात Department of Commerce Bharti 2023
अधिकृत वेबसाईटcommerce.gov.in

Recent Articles