महत्वाची बातमी: नगर रचना विभागामार्फत घेण्यात येणारी ‘रचना सहाय्यक तसेच अन्य पदांची परीक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक लवकरच | Directorate of Town Planning Exam 2024
मुंबई | महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत घेण्यात येणारी परिक्षा (Directorate of Town Planning Exam 2024) काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे कळविण्यात येत आहे.
पुणे / कोकण / नागपूर नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
सर्व प्रकारच्या खाजगी तसेच सरकारी नोकरींची माहिती तत्काळ मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या Telegram किंवा Whats App ग्रुपला जॉईन करा. जेणेकरून कोणतीही नोकरीची संधी चुकणार नाही.
यासाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुषंगाने यापूर्वीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये सदरहू पदांच्या परीक्षा माहे नोव्हेंबर २०२४ मधील दि.२५/११/२०२४, दि.२६/११/२०२४ व दि.२७/११/२०२४ या दिनांकास घेण्याचे नियोजित होते.
१) रचना सहायक पदाची परीक्षा सदरची परीक्षा दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर, २०२४ ऐवजी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
२) निम्नश्रेणी लघुलेखक व उच्चश्रेणी लघुलेखक या पदांच्या परीक्षा दि.२६ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येत आहेत. या पदांच्या परीक्षांचे प्रवेश पत्र (Hall Ticket) प्राप्त करून घेण्याबाबतची लिंक नजीकच्या कालावधीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.