दिल्ली मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० पगार | DMRC Recruitment 2024
मुंबई | दिल्ली मेट्रो अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे. याठिकाणी सुपरवायजर, ज्युनिअर इंजिनियर, असिस्टंट सेक्शन इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी delhimetro.rail.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२४ आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग, आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनियरिंग पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५५ ते ६५ वर्ष असायला हवे. नोकरीसाठी तुमची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीनंतर तुम्हाला फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या वयानुसार आणि अनुभवानुसार वेतन दिले जाणार आहे. ३५४०० ते ११२४०० रुपये इतके वेतन या नोकरीसाठी देण्यात येईल.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने career@dmrc.org या ई-मेलवर जाऊन अर्ज करावा. त्याचसोबत तुम्ही कार्यकारी निर्देशक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंभा रोड, नवी दिल्ली येथे अर्ज पाठवायचा आहे.
PDF जाहिरात | DMRC Recruitment 2024 |
अधिकृत वेबसाईट | www.delhimetrorail.com |