DPSE Goa Recruitment | DPSE Goa अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

मुंबई | संचालक, नियोजन, सांखिकी आणि मूल्यमापन संचालनालय, गोवा सरकार, पर्वरी, बार्देस, गोवा यांच्याकडून (DPSE Goa Recruitment) गोवा मुख्यमंत्री शिष्यवृत्ती कार्यक्रम, सन २०२२-२३ अंतर्गत ५ स्नातकांच्या जागा भरण्याकरिता पात्र गोमंतकीय उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – स्नातक
पद संख्या – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – गोवा
वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.goadpse.gov.in
PDF जाहिरातhttp://bit.ly/3UzbZpc (DPSE Goa Recruitment)
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3UvMXHm

शैक्षणिक पात्रता –
स्नातक –
१. कोणत्याही शाखेमधील मास्टर्स पदवी.
२. संबंधित क्षेत्रामधील कामाचा अनुभव.
३. इ. १० वी आणि १२ वीच्या सार्वजनिक परीक्षा ह्या गोवा राज्यामधूनच उत्तीर्ण झालेल्या असणे आवश्यक.
४. कोंकणी भाषेचे ज्ञान. (DPSE Goa Recruitment)
५. इंग्रजी भाषेमधून सर्व प्रकारचे संपर्क करण्यात उमेदवार उत्कृष्ट कौशल्यधारक असावा मराठी भाषेचे ज्ञान.

वेतनश्रेणी –
स्नातक –
पहिल्या महिन्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम असेल आणि प्रशिक्षण कालावधीदरम्यान रु. १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) स्टायपेंड दिला जाईल. त्यानंतर, उर्वरित ११ महिन्यांसाठी रु. ४०,०००/- प्रति महिना (रुपये चाळीस हजार फक्त) शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल. (DPSE Goa Recruitment)

Recent Articles