Dream 11 Jobs | आतापर्यंत टीम बनवली आता ड्रीम इलेव्हन कंपनी देतेय थेट नोकरीची संधी

मुंबई | Dream 11 हे मोबाईल गेमिंग अ‍ॅप क्रिकेटच्या चाहत्यांना चांगलच माहित आहे. याच ड्रीम इलेव्हन अ‍ॅपने नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी रोजगाराची नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनी तुम्हाला क्रिकेट टीम बनवून खेळायला सांगत नाही तर थेट नोकरीची (Dream 11 Jobs) ऑफर देत आहे. त्यासाठी त्यांनी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

ड्रीम इलेव्हन कंपनी असोसिएट मॅनेजर व बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स या पदासाठी उमेदवार शोधत आहे. नोकरीचं ठिकाण मुंबई असून, या पदासाठी निवडल्या (Dream 11 Jobs) जाणाऱ्या उमेदवारांना SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करावे लागतील.

याबरोबरच
Director/Senior Manager – UX
Manager – Finance
Associate Manager – Marketplace
Director – Buying & Merchandising,AVP – Risk Management
Director – Internal Audit
VP – Product Design
Director – Treasury
General Manager – Company Secretary
Consultant – Sports Operations
Associate Manager – Business Analytics
Engineering Manager – Backend
Engineering Manager – Frontend
Lead Security Engineer – Threat Detection & Response
SDE 3 – Android
SDE 3 – DevOps
SVP – Security यासारखी विविध पदेही भरली जात आहेत.

असोसिएट मॅनेजर व बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स या पदासाठी पात्रतेच्या अटी आणि कोणती स्कील्स आवश्यक आहेत हे जाणून घेऊन मगच इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. त्यासाठी अधिकृत लिंक खाली दिलेली आहे. (Dream 11 Jobs)

भूमिका आणि जबाबदाऱ्या –

  • अ‍ॅनॅलिटिकल सोल्युशनिंग स्कील्स वापरून मोठ्या प्रमाणावर वास्तविक बिझनेस प्रॉब्लेम्स सोडवणं.
  • डिझाईन आणि प्रयोगांचं विश्लेषण (A/B चाचण्या, सिंथेटिक नियंत्रण इत्यादी.) आणि उत्पादन वैशिष्ट्यांना प्राधान्य देण्यासाठी मदत करणं.
  • डेटाद्वारे युजर्सना इनसाइट्स प्रदान करणं: युजर्सचं विभाजन, दीर्घकालीन ट्रेंड आणि वर्तणूक विश्लेषण.
  • ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटर्जी व प्रॉडक्ट रोडमॅप्ससाठी बिझनेस व प्रॉडक्ट टीमसोबत काम करणं.
  • SQL, Python इत्यादी टूल्सचा वापर करून योग्य मेट्रिक्स डिझाईन आणि इन्स्ट्रुमेंटेशनद्वारे बिझनेस हेल्थ डॅशबोर्ड तयार करणं.

असोसिएट मॅनेजर व बिझनेस अ‍ॅनॅलिटिक्स पदासाठी पात्रतेच्या अटी –

  • दोन वर्षांपेक्षा जास्त अ‍ॅनॅलिटिकल अनुभव.
  • SQLमध्ये काम करण्याचा अनुभव.
  • गूगल अ‍ॅनॅलिटिक्स, लूकर, PowerBI व Tableau इत्यादी टूल्समध्ये काम करण्याचा अनुभव.
  • पायथॉनसारख्या स्टॅटिस्टिकल अ‍ॅनॅलिसिस लँग्वेजचा अनुभव.

या पदासाठी अर्ज करण्यास तुम्ही इच्छुक असाल तर ड्रीम इलेव्हन करिअर (Dream 11 Career) या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तिथे दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. वर दिलेल्या पात्रतेच्या अटी तुम्ही पूर्ण करत असाल, व तुम्हाला ड्रीम इलेव्हनमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा या संदर्भात त्यांच्या वेबसाईटवर सविस्तर माहिती दिली असेल.

Recent Articles