मुदतवाढ: 10वी उत्तीर्णांना 1 लाख 32 हजार पगाराच्या नोकरीची संधी, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 पदांवर भरती | DTP Maharashtra Bharti 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
Mumbai | The Department of Town Planning and Valuation, Maharashtra has issued a recruitment notification inviting applications for 289 vacant posts of Composition Assistant, High Grade Stenographer, and Middle Grade Stenographer.
Eligible and interested candidates can apply online for the DTP Maharashtra Bharti 2024 through the official website. The last date to submit applications is29 August 202409 September 2024(मुदतवाढ.
For more details on eligibility criteria, application process, and other important information, candidates are advised to visit the official website of the Department of Town Planning and Valuation, Maharashtra.DTP Maharashtra Bharti 2024
मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात मोठी भरती (DTP Maharashtra Bharti 2024) करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विभागा अंतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती याठिकाणांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक आणि उच्चश्रेणी लघुलेखक अशा एकूण 289 पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. तर उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाइन पध्दतीने 29 ऑगस्ट 2024 09 सप्टेंबर 2024(मुदतवाढ पर्यंत भरावे लागणार आहेत.
कोण करू शकतो अर्ज?
- ज्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- ज्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे आहे. (मागासवर्गीय, दिव्यांग, खेळाडूंसाठी वयोमर्यादेत शिथिलता आहे.)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रचना सहाय्यक | स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षाची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक. |
उच्चश्रेणी लघुलेखक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वंग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अहंता धारण करणे आवश्यक. |
निम्नश्रेणी लघुलेखक | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि, लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र हो अर्हता धारण करणे आवश्यक. |
कधी करायचा अर्ज?
- अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया 30 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
29 ऑगस्ट 202409 सप्टेंबर 2024(मुदतवाढ आहे.
अर्ज कसा करायचा?
- उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या www.urban.maharashtra.gov.in किंवा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती भरून द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
रचना सहाय्यक | 38600/- to 122800/- |
उच्चश्रेणी लघुलेखक | 41800/- to 132300/- |
निम्नश्रेणी लघुलेखक | 38600/- to 122800 |
महत्वाची माहिती:
- अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे.
- मागासवर्गीय, दिव्यांग आणि खेळाडूंना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात | DTP Maharashtra Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | DTP Maharashtra Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | dtp.maharashtra.gov.in |