DTP Maharashtra Recruitment | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांची भरती | GR आला..

मुंबई | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा आढावा घेऊन, संदर्भीय क्र.२ येथील दि.०१.०३.२००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ११७६ पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. (DTP Maharashtra Recruitment)

विभागाच्या दि.०१.०३.२००६ च्या आकृतीबंधात तद्नंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या पद निर्मिती / पद निरसन यामुळे झालेला बदल विचारात घेऊन, वित्त विभागाच्या दि.२९.०६.२०१७ रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार, नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.

मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि. १३.१२.२०२२ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या (५/२०२२) बैठकीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील ११४८ नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण ५१ मनुष्यबळ / सेवा याप्रमाणे सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आकृतिबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.१३.१२.२०२२ रोजी झालेल्या बैठकीत विचार करण्यात येऊन समितीने सुधारित आकृतीबंधास मंजूरी दिली असल्याचे वित्त विभागाने संदर्भीय क. ७ येथील दि.३०.१२.२०२२ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार, नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सुधारित आकृतीबंध पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे.

नवीन प्रकाशित शासन आदेश पहा (क्लिक करा)


DTP Maharashtra Recruitment | नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत रिक्त जागांची भरती; १,२२,८०० पगार

पुणे | महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत (DTP Maharashtra Recruitment) पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभागातील “रचना सहायक” (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा 01 एप्रिल 2023 पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – रचना सहायक
पदसंख्या – 177 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग

वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज शुल्क –
अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
राखीव प्रवर्ग – रु. 900/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट 1 – www.maharashtra.gov.in
अधिकृत वेबसाईट 2 – dtp.maharashtra.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/zILQ8 (DTP Maharashtra Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा Ishorturl.at/uxKX6
ऑनलाईन अर्ज करा IIshorturl.at/qzIP8

शैक्षणिक पात्रता –
रचना सहायक – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

वेतनश्रेणी –
रचना सहायक – Rs. 36,800 – 1,22,800/-

सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (DTP Maharashtra Recruitment)

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
अर्ज 01 एप्रिल 2023 पासून सुरू होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recent Articles