पर्यावरण व वातावरणीय बदल विभागात नवीन भरती, त्वरित अर्ज करा | Environment & Climate Change Department Jobs 2023

मुंबई | पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली असून पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.

याठिकाणी, विधि अधिकारी, प्रकल्प विश्लेषण, कोस्टल समन्वयक,लेखापाल, लघुलेखक, लिपिक- टंकलेखक, डेटा एन्टी ऑपरेट पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. सदर रिक्त पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता –  recruitment-envcc@mah.gov.in

शैक्षणिक पात्रता
विधि अधिकारी – विधि विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
प्रकल्प विश्लेषण – अभियांत्रिकी कमीत कमी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी
कोस्टल समन्वयक – अभियांत्रिकी कमीत कमी शास्त्र व तत्सम विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्यूत्तर पदवी
लेखापाल – वाणिज्य विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी/पदव्युत्तर पदवी
लघुलेखक/लिपिक- टंकलेखक/डाटा एंट्री ऑपरेटर
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, लघुलेखन : मराठी- 100 श.प्र.मि., टंकलेखन : मराठी- 30 श. प्र.मि. इंग्रजी 40 श.प्र.मि.

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे. अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2023 आहे.

 PDF जाहिरातEnvironment & Climate Change Department Jobs 2023
अधिकृत वेबसाईटenvd.maharashtra.gov.in

Recent Articles