नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना वित्त विभाग महाराष्ट्र, मुंबई (Finance Department Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अवर सचिव, सहायक लेख अधिकारी रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (Finance Department Recruitment) एकूण 03 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
अवर सचिव –
1. मंत्रालयीन विभागातून पीएफएमएस /एसएनए व अर्थसंकल्पीय कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव असलेला व अवर सचिव पदावरून सेवानिवृत्त झालेले अधिकारी असावा. वित्त विभागात हे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य राहील.
2. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
3. उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
4. उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.
सहायक लेख अधिकारी –
1. लेखधिकारी पदासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतून किमान ३ वर्षांचा अनुभव असलेला सेवानिवृत्त लेखाधिकारी असावा
2. उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असावे.
3. उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
4. उमेदवार मुंबई अथवा लगतच्या जिल्ह्यात राहणारा असावा.
अधिकृत वेबसाईट – finance.maharashtra.gov.in