Flipkart Career | फ्लिपकार्ट मध्ये विविध शैक्षणिक पात्रता धारकांना नोकरी | तब्बल 114 रिक्त जागांसाठी भरती

मुंबई | देशातील प्रमुख ई-कॉमर्स कंपनी फ्लिटकार्ट मध्ये विविध रिक्त पदांसाठी नोकरीची (Flipkart Career) मोठी संधी आहे. 2007 साली स्थापन झालेली फ्लिपकार्ट कंपनी ई-कॉमर्स, पेमेंट गेटवे, लॉजिस्टिक्स आणि वितरण सेवांच्या उत्पादनासाठी काम करते.

सध्या कंपनीला मुंबई, पुणे, बेंगलोर, लुधियाना अहमदाबाद, नोएडा, गुरगाव, बिनोला, सोनीपत, हैदराबाद, कोलकता आणि लखनऊ या ठिकाणासाठी विविध पदांच्या मनुष्यबळाची गरज आहे. सध्याच्या घडीला तब्बल ११४ ओपनिंग्ज (Flipkart Career) असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून त्या-त्या पदांसाठी थेट अर्ज करावेत.

रिक्त पदांमध्ये मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्सिक्युटिव्ह, सिनियर एक्सिक्युटिव्ह, ऑपरेशन एक्सिक्युटिव्ह, असोसिएट टेक्निकल लीड, कन्सलटंट, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर यासारखी अनेक पदांचा समावेश आहे.

रिक्त पदांसाठी त्याच्या गरजेनुसार शिक्षण आणि अनुभवाची आवश्यकता असून उमेदवारांनी इच्छित पदासाठी अर्ज करण्यापूर्वी पदांसाठी आवश्यक असणारी माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत. अर्ज करण्यासाठी Flipkart Career या लिंकवर जाऊन तुमच्या योग्य पदासाठी अर्ज करावेत.

Recent Articles