मुंबई | मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात निवडणूक (GAD Recruitment) संचलन व मंत्रालयीन कामकाजाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी यांची करार पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी नामिकासूची तयार करावयाची आहे. यास्तव “अवर सचिव” पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज, सदर जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांत, कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी ०९.४५ वाजेपासून सायंकाळी ०६.१५ वाजे पर्यंत उपरोक्त नमूद कार्यालयीन पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह बंद लिफाप्यात पाठवावेत. विहीत मुदतीत न आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
पदाचे नाव – अवर सचिव
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव, कार्यासन 6, सामान्य प्रशासन विभाग, 19 वा मजला, मंत्रालय, नवीन प्रशाकीय भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालयासमोर मुंबई- 400032 (GAD Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2023
अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/hvyzZ
शैक्षणिक पात्रता –
अवर सचिव –
१. उमेदवार शासकीय सेवेतून अवर सचिव या पदावरून सेवानिवृत्त असावा.
२. उमेदवारास मंत्रालयीन स्तरावरील कामाचा अनुभव असावा. (GAD Recruitment)
३. निवडणूक संचलन या कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असावा.
या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज नमूद संबंधित पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावेत.
थेट प्राप्त झालेल्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मे 2023 आहे.
विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. (GAD Recruitment)