नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना गोवा मानव संसाधन विकास महामंडळ अंतर्गत नोकरीची (GHRDC Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत सुरक्षा अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 04 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (GHRDC Recruitment)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 19 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा व्यवस्थापकीय संचालक, जीएचआरडीसी, डीआयईटी बिल्डींग शेजारी, आल्तो–पर्वरी, बार्देस गोवा ४०३५२१ असा आहे.
शैक्षणिक पात्रता –
सुरक्षा अधिकारी –
१. उमेदवार XII उत्तीर्ण असावा त्याचबरोबर किमान १५ वर्षे संरक्षण सेवा/सीआयएसएफ/ बीएसएफ / पोलीस मधील एनसीओ श्रेणीमध्ये किंवा सशस्त्र सेना / इतर सेनेमध्ये समतुल्य श्रेणीमध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
२. कोंकणी भाषेचे ज्ञान आवश्यक. (GHRDC Recruitment)
३. मराठी भाषेचे ज्ञान अपेक्षित.
वेतनश्रेणी –
सुरक्षा अधिकारी – Rs. 30,000/- per month
अधिकृत वेबसाईट – ghrdc.goa.gov.in