Gold Silver Market

सोनं आलं 58 हजारावर; चांदीत देखील घसरण सुरूच, जाणून घ्या आजचे दर | Gold Rate Today

मुंबई, 13 Nov. 2024 | डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाल्यापासून व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडत आहे. पहिल्यांदाच डॉलर इंडेक्स मजबुतीने पुढे सरकला आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. डॉलर निर्देशांक वधारला असून अनेक दिवसानंतर त्याची मजबूत चाल सुरू आहे. त्याचबरोबर जगभरात सोने आणि चांदीची मागणी देखील कमी झाली आहे.

ट्रम्प यांच्या निवडीमुळं रशिया-युक्रेन युद्ध, मध्य-पूर्वेतील इस्त्रायल विरुद्ध हमास युध्द, हिजबुल्ला आणि इराण आघाडीचे युद्ध थांबवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास या मौल्यवान धातुंचा भाव आणखी खाली येण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या निवडीमुळे व्यापार आणि व्यावसायिक जगतात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

Gold Silver Price Today 13 November 2024

सोन्यात मोठी पडझड (Gold Rate Today)

या आठवड्यात सोन्याच्या किंमती जोरात आपटल्याचे पहायला मिळत आहे. सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले होते. तर मंगळवारी किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली. सोने पुन्हा घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,990 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,430 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण (Silver Rate Today)

मागील आठवड्यात चांदीत काहीच हालचाल झाली नाही. चांदीत 4 हजारांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. मंगळवारी चांदीत 2 हजारांची स्वस्ताई आली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आज 90,900 रुपये इतका आहे.

आज 18 कॅरेट सोने दर (रु)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 5,808₹ 5,809-1
8₹ 46,464₹ 46,472-8
10₹ 58,080₹ 58,090-10
100₹ 5,80,800₹ 5,80,900-100

आज 22 कॅरेट सोने दर (रु)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 7,099₹ 7,100– ₹ 1
8₹ 56,792₹ 56,800– ₹ 8
10₹ 70,990₹ 71,000– ₹ 10
100₹ 7,09,900₹ 7,10,000– ₹ 100

आज 24 कॅरेट सोने दर (रु)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 7,743₹ 7,744– ₹ 1
8₹ 61,944₹ 61,952– ₹ 8
10₹ 77,430₹ 77,440– ₹ 10
100₹ 7,74,300₹ 7,74,400– ₹ 100

भारतातील मोठ्या शहरातील आजचे सोन्याचे दर (1 ग्रॅम)

शहर22 कॅरेट सोने
आज
24 कॅरेट सोने
आज
18 कॅरेट सोने
आज
लखनऊ₹ 7,099₹ 7,743₹ 5,808
जयपुर₹ 7,099₹ 7,743₹ 5,808
नई दिल्ली₹ 7,099₹ 7,743₹ 5,808
पटना₹ 7,089₹ 7,733₹ 5,800
मुंबई₹ 7,084₹ 7,728₹ 5,796
अहमदाबाद₹ 7,089₹ 7,733₹ 5,800
पुणे₹ 7,084₹ 7,728₹ 5,796
कोलकाता₹ 7,084₹ 7,728₹ 5,796
मेरठ₹ 7,099₹ 7,743₹ 5,808
लुधियाना₹ 7,099₹ 7,743₹ 5,808

आज चांदीचे दर प्रति ग्रॅम/किलोग्रॅम (रु)

ग्रॅमआजकालबदल
1₹ 90.90₹ 91– ₹ 0.10
8₹ 727.20₹ 728– ₹ 0.80
10₹ 909₹ 910– ₹ 1
100₹ 9,090₹ 9,100– ₹ 10
1000₹ 90,900₹ 91,000– ₹ 100

सोन्याच्या भावात आणखी घसरण होणार?

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या सोन्याचा कल सध्या मंदीचा आहे. म्हणजे घसरणीचा ट्रेंड आहे. फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर सोन्याच्या डिसेंबर फ्युचर्ससाठी 74480/73500 प्रति 10 ग्रॅमचा सपोर्ट आहे, तर 75405/76080. प्रति 10 ग्रॅम प्रतिरोधक पातळी आहेत.

सोन्याच्या भावात का घसरण?

केडिया ॲडव्हायझरीचे अजय केडिया सांगतात की, सोन्या-चांदीच्या किंमतीत नरमाई आहे. याचे कारण सातत्याने मजबूत होत असलेला डॉलर आणि कमकुवत जागतिक अर्थव्यवस्थेची चिंता हे आहे. चांदीचा भाव 1 महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. कारण डॉलर सतत मजबूत होत आहे. तसेच चीनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजचा देखील यावर परिणाम दिसून येत आहे.

केडिया म्हणाले की, सोन्याचे भावही जवळपास 2 महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेले आहेत. कारण सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याची मागणी कमी होत आहे. याशिवाय मजबूत डॉलरचाही सराफा बाजारावर दबाव आहे. याशिवाय, अमेरिकेच्या धोरणाबाबत अपेक्षा आणि चीनच्या आर्थिक आव्हानांचा परिणाम हेही कमोडिटी मार्केटसाठी महत्त्वाचे ट्रिगर्स राहिले आहेत.


मुंबई, 12 Nov. 2024 | सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईच्या दिवसात स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ७९ हजारांवर जाऊन पोहोचला होता, मात्र हाच दर आता ७५ हजारांच्या आसपास आला आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता थेट ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे.

कालच्या तुलनेत आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते स्थानिक बाजारापर्यंत सर्वच सोन्याच्या किंमतींमध्ये ही घसरण दिसून येत आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८८,८३० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१४४ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ८८८ रुपये आहे. आज सोन्याचा दर १८० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ६३० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर १८० रुपयांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ९५ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज जवळपास ५८०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ६३० रुपयांनी घसरला आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात घसरण झाली आहे.

Gold Rate Today
Gold Rate Today

मुंबई -11 Nov. 2024 | देशात लवकरच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात सोने-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसत आहे. यातच खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सोन्याच्या किंमती कमी (Gold Rate Today) झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते स्थानिक बाजारापर्यंत सर्वत्र सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे.

यंदाच्या लग्नसराईत नोव्हेंबरमध्ये 12,13,17, 18, 22, 23, 25, 26, 28 आणि 29 हे विवाह मुहुर्त आहेत. तर डिसेंबरमध्ये 4, 5, 9, 10, 11,14, 15 आणि 16 तारखेला विवाह मुहुर्त असल्याचे दिसत आहे. त्यानंतर जवळपास महिनाभर लग्नसराईला ब्रेक लागणार आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये मात्र जानेवारी ते मार्च या काळात पुन्हा लग्नसराईला सुरूवात होणार आहे.

आज अमेरिकी कॉमेक्सवर सोन्याची किंमत 2,673.20 डॉलर प्रति औंस इतकी आहे तर चांदीची किंमत 31.45 डॉलर प्रति औंस इतकी आहे. यासोबत देशातील मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याची किंमत 76,742.00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर चांदीची किंमत 91,308.00 रुपये किलो इतकी आहे.

देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,363 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच चांदीची किंमत 91,330 रुपये प्रति किलो आहे.

जाणून घेऊया राज्यातील शहरांमधील सोने-चांदीचे भाव (Gold silver Rate)

शहराचे नावआजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)कालचा 22 सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई70,528 रुपये71,060 रुपये
पुणे70,528 रुपये71,060 रुपये
नागपूर70,528 रुपये71,060 रुपये
कोल्हापूर70,528 रुपये71,060 रुपये
जळगाव70,528 रुपये71,060 रुपये
ठाणे70,528 रुपये71,060 रुपये
शहराचे नावआजचा 24 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)कालचा 24 सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई76,940 रुपये77,520 रुपये
पुणे76,940रुपये77,520 रुपये
नागपूर76,940 रुपये78,490 रुपये
कोल्हापूर76,940 रुपये77,520 रुपये
जळगाव76,940 रुपये77,520 रुपये
ठाणे76,940 रुपये77,520 रुपये

आजचा चांदीचा भाव (Silver Rate Today)

शहराचे नावआजचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)कालचा चांदीचा भाव (प्रतिकिलो)
मुंबई91,480 रुपये92,340 रुपये
पुणे91,480 रुपये92,340 रुपये
नागपूर91,480 रुपये92,340 रुपये
कोल्हापूर91,480 रुपये92,340 रुपये
जळगाव91,480 रुपये92,340 रुपये
ठाणे91,480 रुपये92,340 रुपये

Back to top button