गुगल कंपनीत नोकरी मिळवायची आहे? मग ही संधी सोडू नका..! Google Career

मुंबई | जगप्रसिध्द टेक कंपनी गुगल सध्या नव्या उमेदवारांच्या (Google Career) शोधात आहे. कंपनीने आपल्या ‘विंटर इंटर्नशिप 2024’ची घोषणा केली आहे. कम्प्युटर सायन्स किंवा अन्य निगडित क्षेत्रांत बॅचलर्स, मास्टर्स किंवा ड्युएल डिग्री प्रोग्रामच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता ही चांगली संधी आहे.

यामध्ये प्रोग्राम अंतर्गत फ्रेशर्स आणि अनुभव नसलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. करिअरची चांगली सुरवात करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग इंटर्न म्हणून निवड होणाऱ्या उमेदवारांना कंपनीची कोअर प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना गुगलच्या इंजिनीअरिंग ऑपरेशन्सच्या महत्त्वाच्या कार्यांमध्ये योगदान देता येईल. सर्चचा दर्जा सुधारणे, कम्प्युटर प्लॅटफॉर्म आणि नेटवर्किंग टेक्नॉलॉजिज विकसित करणे, व्हिडिओ इंडेक्सिंग ऑटोमेट करणे, कॉम्प्लेक्स ऑक्शन सिस्टीम ऑप्टिमाइझ करणे आदी कामे या उमेदवारांना करावी लागणार आहेत. तसेच गुंतागुंतीच्या तांत्रिक समस्यांवर क्रिएटिव्ह आणि नावीन्यपूर्ण सोल्युशन्स काढणे याच्याशी संबंधित कामे या इंटर्नशिपमध्ये करावी लागणार आहेत.

इंटर्नशिपचा कालावधी : जानेवारी 2024पासून 22 ते 24 आठवडे
वेतन : 83,947 रुपये (मासिक)
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 1 ऑक्टोबर 2023

कसा करणार अर्ज : तुमचा अद्ययावत सीव्ही, बायोडाटा तयार ठेवा. गुगलच्या संबंधित वेबसाईटवर जाऊन रिझ्युम सेक्शन निवडा. तिथे बायोडाटा अपलोड करा. या ठिकाणी आवश्यक ती माहिती तपशीलासह भरा. योग्य माहिती जमा करा. तुम्हाला नोकरीसाठी बंगळुरु, हैदराबाद यापैकी कोणतेही स्थान योग्य वाटते, ते निवडा.

या लिंकवर पाठवा अर्ज : Google Student Internship -2024
अर्ज करण्यासाठी लिंक : google-winter-internship-2024

आवश्यक पात्रता – गुगलने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिपची ऑफर दिली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना, मुख्य उत्पादने आणि सेवांमध्ये भूमिका निभवावी लागेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील पदवी, मास्टर डिग्री आवश्यक आहे. C, C++, Java, JavaScript, Python या भाषेचे ज्ञान असावे. कोडिंगची आवड असावी. इतर माहिती तुम्हाला संबंधित लिंक मिळेल.

Recent Articles