पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात लाखो रूपये पगाराची नोकरी; संधी चुकवू नका | Government Job

मुंबई | पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (एमओईएफसीसी) अंतर्गत कर्मचारी भरती (Government Job) सुरू झाली आहे. एमओईएफसीसीच्या वतीने टेक्निकल फुल टाईम मेंबर आणि दिल्ली CAQM फुल टाईम मेंबर या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (एमओईएफसीसी) हे भारत सरकारचं मंत्रालय (Government Job) आहे. देशातील पर्यावरण आणि वनीकरण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचं नियोजन, प्रचार, समन्वय आणि देखरेख करण्याची जबाबदारी या मंत्रालयावर आहे. हे मंत्रालय भारतातील वनस्पती आणि भारतातील प्राणी, जंगलं आणि इतर वाळवंटी क्षेत्रांचं संवर्धन आणि सर्वेक्षण करण्याचंदेखील काम करतं. या सर्व कामांसाठी मंत्रालयाला कुशल मनुष्यबळाची गरज भासते.

या पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांना तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा त्यांच्या वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जी मुदत आधी असेल तोपर्यंत सेवेत घेतलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगाच्या पे मॅट्रिक्सनुसार 1 लाख 82 हजार 200 रुपये ते 2 लाख 24 हजार 100 रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज अधिकृत अधिसूचनेत दिलेल्या विहित नमुन्याप्रमाणे भरून त्याचे चार संच अंतिम मुदतीपूर्वी खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज सादर करण्याची शेवटची वेळ 15 मे 2023 रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे. अधिक तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना वाचू शकतात.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

श्री वेद प्रकाश मिश्रा, संचालक,
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, दुसरा मजला, जल विंग, इंदिरा पर्यावरण भवन, जोर बाग रोड, नवी दिल्ली – 110003.

Recent Articles