केंद्र सरकारच्या मिनीरत्न कंपनीत नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज | Government Job

मुंबई | नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी (Government Job) उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या पवन हंस लिमिटेड कंपनीने ग्रॅज्युएट उमेदवारांकडून अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्रॅम नॉन-इंजिनीअरिंगसाठी अर्ज मागवले आहेत.

ग्रॅज्युएट उमेदवारांकडून अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम नॉन-इंजिनीअरिंगसाठी फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स व एरोनॉटिक्स क्षेत्रातील उत्साही आणि रिझल्ट ओरिएंटेड उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 33 जागा रिक्त आहेत.

अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता
फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स व एरोनॉटिक्ससाठी –
BBA,B.Sc., B.Com., B.Sc (Aviation) या जागा तीन वर्षांसाठी भरल्या जातील.
सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिक्स, मॅकेनिकलसाठी – B.Tech. या जागा एका वर्षासाठी भरल्या जातील. (Government Job)

वेतनश्रेणी –
पदवीधर शिकाऊ उमेदवार – Rs.15,000/- Per Month

अधिकृत वेबसाईटwww.pawanhans.co.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/ilstV

Recent Articles