Govt of India Jobs | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ 5 विभागांमध्ये मोठी भरती

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी (Govt of India Jobs) ही महत्वाची बातमी आहे. सध्या सरकरी विभागांमध्ये आणि आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सरकारी विभाग तसेच अधिपत्याखालील विभागांमध्ये निवड झाल्यास दरमहा 50 हजारांपासून ते 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल. ‘दैनिक भास्कर’ने याबाबत वृत्त दिलंय.

सध्या SBI, बिहार विधानसभा, गुजरात हायकोर्ट, भारतीय लष्कर व अणुऊर्जा विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. (Govt of India Jobs)

बिहार विधानसभेत सुरक्षारक्षक पदाची भरती

बिहार विधानसभेत 69 सुरक्षारक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. या भरती प्रक्रियेत बारावी उत्तीर्ण झालेले 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 असून उमेदवाराची निवड ही ऑनलाइन/ऑफलाइन परीक्षा, शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 170 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 20 रुपये आहे. विधानसभेत सुरक्षारक्षक पदावर निवड झाल्यास 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीची अधिक माहिती www.vidhansabha.bih.nic.in या वेबसाइटवर मिळेल.

गुजरात हायकोर्टात असिस्टंट पदांसाठी भरती

गुजरात हायकोर्टात 1778 असिस्टंट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. या भरती प्रक्रियेत ग्रॅज्युएशन उत्तीर्ण झालेले 21 ते 35 वर्ष वयोगटातील व इंग्रजी किंवा गुजराती टायपिंग येणारे उमेदवार सहभागी होऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 असून उमेदवाराची निवड ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व टायपिंग टेस्टद्वारे केली जाईल. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 1000 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 500 रुपये आहे. या पदावर निवड झाल्यास 19900 ते 63200 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीची अधिक माहिती gujarathighcourt.nic.in या वेबसाइटवर मिळेल.

अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी भरती

अणुऊर्जा विभागात विविध 65 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 12, ओबीसी प्रवर्गासाठी 8, एससी प्रवर्गासाठी 23 आणि ईडब्ल्युएस प्रवर्गासाठी 22 पदं आहेत. भरती प्रक्रियेत बीएस्सी व बीकॉम उत्तीर्ण झालेले 18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 असून उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा व स्किल टेस्ट द्वारे केली जाईल. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 200 रुपये असेल, तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. या पदावर निवड झाल्यास 32,000 ते 64,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीची अधिक माहिती dpsdae.formflix.in या वेबसाइटवर मिळेल.

लष्करात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी

भारतीय लष्करात विविध 40 पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. यामध्ये प्रत्येक पदानुसार परीक्षा शुल्क वेगवेगळं आहे. भरती प्रक्रियेत इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतलेले 20 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 असून उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, मेडिकल टेस्ट व मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड झाल्यास 56,000 ते 2,50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीची अधिक माहिती joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर मिळेल.

SBI मध्ये विशेष अधिकारी पदांसाठी भरती

एसबीआय मध्ये 217 विशेष अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. या भरती प्रक्रियेत बीई, बीटेक, एमसीए, एमटेक उत्तीर्ण झालेले 21 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 असून उमेदवाराची निवड ही इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 750 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी कोणतेही शुल्क नाही. या नोकरीसाठी निवड झाल्यास 32,000 ते 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीची अधिक माहिती sbi.co.in या वेबसाइटवर मिळेल.

Recent Articles