सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी; महत्त्वाच्या विभागांमध्ये भरती सुरू | Government Job

मुंबई | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी अनेक शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जे सरकारी नोकरीसाठी (Government Job) इच्छुक आहेत, ते त्यांच्या पात्रतेनुसार खाली दिलेल्या विभागांमध्ये रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) भरती (Government Job)

बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने (BSF) कम्युनिकेशन विंगमधील हेड कॉन्स्टेबल पदांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार BSF च्या rectt.bsf.gov.in या रिक्रुटमेंट पोर्टलवर अर्ज करू शकतात. BSF च्या हेड कॉन्स्टेबल भरतीसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 12 मे आहे. या भरती मोहिमेद्वारे, BSF चे एकूण 247 रेडिओ ऑपरेटर (RO) आणि रेडिओ मेकॅनिक (RM) पदं भरली जातील. यामध्ये हेड कॉन्स्टेबलच्या (रेडिओ मेकॅनिक) 30 जागा आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) च्या 217 जागा भरल्या जाणार आहेत.

UPSC CMS अंतर्गत 1,261 पदांसाठी भरती (Government Job)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कम्बाईन्ड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम (CMS) 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार upsconline.nic.in वर अर्ज भरू शकतात. UPSC CMS परीक्षेचा फॉर्म सबमिट करण्याची शेवटची तारीख 9 मे 2023 आहे.

UPSC CMS – इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरी, भारतीय रेल्वे, नवी दिल्ली नगरपरिषद आणि दिल्ली महानगरपालिका यासारख्या अनेक सरकारी ऑर्गनायझेशनमध्ये मेडिकल अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा घेतली जाते. उमेदवारांची निवड मल्टि-टायर प्रोसेसमध्ये त्यांच्या कामगिरीच्या आधारावर केली जाते. यामध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखतीचा समावेश आहे. याद्वारे एकूण 1,261 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

बिहार कम्बाईन्ड एन्ट्रन्स कॉम्पिटिटीव्ह एक्झामिनेशन बोर्ड भरती (BCECEB) – 10,101 रिक्त जागा (Government Job)

बिहार कम्बाईन्ड एन्ट्रन्स कॉम्पिटिटीव्ह एक्झामिनेशन बोर्डाने (BCECEB) अमीन, असिस्टंट सेटलमेंट ऑफिसर, क्लार्क आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत सूचनेनुसार, यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 आहे.

उमेदवार रिक्त पदांसाठी bceceboard.bihar.gov.in वर अर्ज करू शकतात. अॅप्लिकेशन प्रोसेस बंद झाल्यावर करेक्शन फॅसिलिटी 18 मे ते 20 मे या कालावधीत उघडेल. यात एकूण 10,101 रिक्त जागा भरल्या जातील.

या पदभरतीसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रते तसेच इतर निकषांच्या माहितीसाठी उमेदवारांनी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन वाचावे.

Recent Articles