HCL Technologies Recruitment | एचसीएल कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांची संधी

मुंबई | सध्या भारतीय आयटी कंपन्यांमध्ये नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीज या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीत देखील नोकरीच्या (HCL Technologies Recruitment) अनेक संधी निर्माण झालेल्या आहेत.  ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी असून HCL Technologies चे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश येथे आहे. एचसीएलची उपकंपनी असलेल्या या कंपनीने 1991 मध्ये  सॉफ्टवेअर सेवा व्यवसायात प्रवेश केला तेव्हापासून ती एक स्वतंत्र कंपनी म्हणून उदयास आली आहे.

HCL उद्योग समूहाचा भाग असलेल्या HCL Technologies मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीची  (HCL Technologies Recruitment) संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तुम्हाला कामाचा अनुभव असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला नोकरीची संधी उपलब्ध आहे. ‘टेकगिग’ने नुकतेच याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

एचसीएल (HCL Technologies Recruitment) भरती

एचसीएल कंपनीनं आपल्या ऑफिसेसमध्ये सीनिअर टेक्निकल लीड पदासाठी कर्मचारी भरती सुरू केली आहे. ही पदे सध्या बेंगलूर ऑफिससाठी भरली जात आहेत. तसेच ज्या उमेदवारांना याव्यतिरिक्त ठिकाणांसाठी आणि इतर वेगवेगळ्या पदांसाठी HCL Technologies मधील नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ख़ाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्यासाठी योग्य ती पोस्ट शोधून त्याप्रमाणे अर्ज़ करावा.

एचसीएल (HCL Technologies Recruitment)

Senior Technical Lead पदाची भूमिका आणि जबाबदाऱ्या

1. ETL प्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणार्‍या SQL सर्व्हर संग्रहित प्रक्रिया, फंक्शन्स, व्ह्युज आणि ट्रिगर्स डिझाइन व विकसित करणं.
2. QRM द्वारे प्रक्रियेसाठी असंख्य अपस्ट्रीम सिस्टिम्समधून डेटा प्राप्त करण्यासाठी आणि तयार करण्यासाठी SSIS / SQL ETL उपायांचं डिझायनिंग आणि डेव्हलपिंग करता आलं पाहिजे.
3. SSIS सह फाइल्समधून डेटा इम्पोर्ट करणं, एका डेटाबेस प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या डेटाबेसवर डेटा हलवणं यासह डेटा ट्रान्सफॉर्मेशन करता येणं गरजेचं.
3. डेटाची अचूक आणि कार्यक्षम प्रोसेस सुनिश्चित करण्यासाठी SSIS किंवा इतर ETL प्रक्रिया डीबग आणि ट्युन करणं.
4. डेटाबेस ऑब्जेक्ट्स (टेबल, व्ह्युज, इंडेक्स) आणि डेटाबेस सिक्युरिटी डिझाईन, अंमलबजावणी आणि देखरेख करणं.

5. SSIS पॅकेजेससह काम करण्याचा अनुभव गरजेचा.
6. मायक्रोसॉफ्ट SSIS सारख्या ETL टूल्समध्ये निपुण असणं गरजेचं.
7. सोर्स, स्टेजिंग आणि ODS/डेटा वेअरहाउस डेस्टिनेशन्समधील डेटा इम्पोर्ट आणि ट्रान्सफर करण्यासाठी स्ट्रॅटजिज आणि दृष्टिकोनांचं विश्लेषण आणि ते विकसित करणं.
8. प्रॉडक्शन आणि नॉन-प्रॉडक्शन वातावरणात तैनात करण्यासाठी ETL प्रक्रियांची तयारी करणं आणि त्यांची चाचणी करणं.
9. SQL सर्व्हर डेटाबेसचं ज्ञान असावं तसंच यासंबंधी डेव्हलपमेंट प्लॅन्स किंवा रिफाईनमेंट टेस्ट प्लॅन्ससह सपोर्ट सिस्टिम व अ‍ॅक्सेप्टन्स टेस्टिंगचही ज्ञान असावं.

10. कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा डेटा इंटिग्रेशन (सोर्सिंग, स्टेजिंग, मॅपिंग, लोडिंग) अनुभव, SSIS प्रीफर्ड CSV फाइल्स, XML फाइल्स, कॉमन रिलेशनल डेटाबेस स्रोतांमधून डेटा बदलण्याचा अनुभव असलेल्या विस्तृत श्रेणीसह SSIS घटकांचे संपूर्ण ज्ञान आवश्यक.
11. ट्रान्झॅक्ट-एसक्यूएल सह संचयित प्रक्रिया डेव्हलपमेंटचा अनुभव गरजेचा.
12. स्टार स्कीमाज आणि डेटा क्युब्जसह रिलेशनल डेटाबेसच्या लॉजिकल आणि फिजिकल डिझाईनचं सखोल ज्ञान आवश्यक.
13. डिस्ट्रिब्युटेड डेव्हलपमेंट टीम्ससह काम करण्याचा अनुभव.

एचसीएल पदभरतीसाठी HCL Tech Career ही लिंक फॉलो करा. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या पदांसाठी नोकरीची यादी पहायला मिळेल. तुमचा अनुभव आणि शिक्षण यानुसार पदाची निवड करून View Job या टॅबवर क्लिक करा. संबधित पदाच्या भरतीसाठी पुरेशी माहिती जाणून घेतल्यानंतर खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करा.

Recent Articles