नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मुख्यालय दक्षिणी कमांड पुणे (Headquarters Southern Command Pune Recruitment) अंतर्गत चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 07 मे 2023 (Headquarters Southern Command Pune Recruitment) पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001 असा आहे.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ –
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. खाजगी शाखा एक्सचेंज (PBX) बोर्ड हाताळण्यात प्रवीणता असणे आवश्यक आहे. (अनुभवाचे प्रमाणपत्र द्यावे लागेल). तसेच इंग्रजी आणि हिंदी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वेतन –
सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ – 21,700/- रुपये प्रतिमहिना (Headquarters Southern Command Pune Recruitment)
अधिकृत वेबसाईट – https://indianarmy.nic.in/
PDF जाहिरात – https://workmore.in/HQ-Southern-Command-Pune-Recruitment.pdf