85,000 रूपये महिना स्टायपेंड; HPCL मध्ये नोकरीची चांगली संधी | HPCL Recruitment

मुंबई | सध्या सरकारी अखत्यारित असणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही रसायनशास्त्र, मायक्रोबायोलॉजी किंवा इंजिनीअरिंग या शाखांमध्ये पी.एचडी किंवा एम.टेक पदवी मिळवलेली असेल तर तुम्हाला हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये (HPCL Recruitment) हमखास नोकरी मिळू शकते.

हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये रिसर्च असोसिएट या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. हे पद फिक्स्ड टर्म बेसिसवर भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज दाखल करावा लागणार आहे. या पदासाठी कंपनीने काही निकष निश्चित केले आहेत.`स्टडी कॅफे डॉट इन`ने याबाबात माहिती दिली आहे. (HPCL Recruitment)

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने पी.एचडी किंवा एम.टेक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहे. बेंगळुरूतील एचपी ग्रीन आर अँड डी सेंटरमध्ये फिक्स्ड टर्म बेसिसवर रिसर्च असोसिएट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात हिंदुस्थान पेट्रोलियमने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. रिसर्च असोसिएट या पदासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 1 जून 2023 ते 30 जून 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

या पदावर पात्र उमेदवाराची नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी केली जाईल. मात्र प्रकल्पाची गरज आणि उमेदवाराच्या कमाल चार वर्षांच्या कार्यक्षमतेच्या आधारे नियुक्तीचा कालावधी आणखी एका वर्षाने वाढवला जाऊ शकतो. उमेदवारांची निवड पात्रता नियमांनुसार अर्ज आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे केली जाईल. त्यानंतर त्यांची निवड समितीद्वारे वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीनंतर निवड अंतिम होईल. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 65,000 ते 85,000 रुपयांदरम्यान स्टायपेंड दिला जाईल.

शैक्षणिक पात्रता –
अधिसूचनेनुसार, रिसर्च असोसिएट या पदासाठी इच्छूक उमेदवाराने केमिस्ट्री, पॉलिमर्स, पॉलिफिन, पेट्रोकेमिकल्स, बॅटरी रिसर्च, मेमब्रेन सेपरेशन अँड अॅडसोरेप्टिव्ह सेपरेशन, कॅटलसिस, मटेरियल्स/ नॅनो मटेरियल्स, अॅनॅलिटिकल अँड ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयांत पी. एचडी केलेली असावी किंवा बायोसायन्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी या विषयात पी.एडी मिळवलेली असावी. इंजिनीअरिंग शाखेत पी.एचडी केलेले उमेदवारही या पदासाठी अर्ज करू शकतात. संबंधित उमेदवाराने केमिकल इंजिनिअरिंग, कम्बशन अँड एमिशन इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, थर्मल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कोरिसन स्टडीजमध्ये मेटलर्जी इंजिनीअरिंग यापैकी एका विषयात पी.एचडी मिळवलेली असावी. वरील विषय तसंच थर्मल इंजिनीअरिंग किंवा पॉलिमर/ प्लास्टिक इंजिनीअरिंग या विषयात एम. टेक झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. एम.टेक झालेल्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात एक वर्ष (1 जून 2023 पर्यंत) काम केल्याचा अनुभव असावा. ऑईल अँड गॅस इंडस्ट्रीमधील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. टिचिंगचा अनुभव या पदासाठी ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिसूचनेनुसार, रिसर्च असोसिएट्स पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय 32 वर्षांपेक्षा जास्त नसावं. मात्र सरकाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ओबीसी (नॉन-क्रिमीलेअर), एससी, एसटी आणि पीडब्लूडी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत असेल. निवडलेल्या उमेदवारांना प्री-एंगेजमेंट मेडिकल फिटनेस टेस्ट द्यावी लागेल. ही टेस्ट कॉर्पोरेशनच्या नियुक्त वैद्यकीय व्यवसायिकाकडून प्रमाणित केली जाईल.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकृत वेबसाईटवर (https://www.hindustanpetroleum.com/job-openings) जात ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्रांसह, पासपोर्ट आकाराच्या फोटोची स्कॅन केलेली प्रत आणि तपशीलवार सीव्हीची सॉफ्ट कॉपी तयार ठेवावी. या पदासाठी अर्ज करण्याकरिता 30 जून 2023 पर्यंत अंतिम मुदत आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियमची अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

Recent Articles