HVDSR कॉलेज नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती; कोणत्याही परिक्षेविना निवड | HVDSR College Nashik Bharti 2024
नाशिक | श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, माननीय तात्यासाहेब उर्फ विश्वासराव देवरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती (HVDSR College Nashik Bharti 2024) करण्यात येत आहे. विविध पदांच्या एकूण 23 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरती अंतर्गत प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
HVDSR College Nashik Bharti 2024
अर्जदारांची निवड करण्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक
- पदसंख्या – 23 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – hvdsr.college.umarane@gmail.com
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मध्यवर्ती कार्यालय श्री. गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, उमराणे, (गिरणारे – मनमाड रोड) ता – देवळा, जि. – नाशिक – 423110.
- मुलाखतीची तारीख – 23 सप्टेंबर 2024
PDF जाहिरात | HVDSR College Nashik Bharti 2024 |
पदाचे नाव | पद संख्या |
प्राचार्य | 01 |
सहायक प्राध्यापक | 20 |
ग्रंथपाल | 01 |
शारीरिक शिक्षण संचालक | 01 |
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती 23 सप्टेंबर 2024रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.