IND BANK Recruitment | इंडबँक अंतर्गत “या” रिक्त पदांवर भरती; असा करा अर्ज

मुंबई | इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (इंडबँक) अंतर्गत भरती सुरु आहे. ही भरती “डीलर” पदासाठी होत असून, यासाठी अर्ज मागवले जात आहेत. या भरती (IND BANK Recruitment) मोहिमेअंतर्गत एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2023 आहे. या नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

पदाचे नाव – ही पदभरती डीलर पदासाठी होत आहे. (IND BANK Recruitment)
पदसंख्या – या भरती अंतर्गत एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता – यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. यासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती अधिसूचना सविस्तर वाचणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा – यासाठी 21 ते 30 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.
अर्ज पद्धती – ॲाफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (भारतीय बँकेची उपकंपनी) # 480, पहिला मजला, खिवराज कॉम्प्लेक्स 1, अण्णा सलाई, नंदनम, चेन्नई 600035
ई-मेल पत्ता – ऑफलाईन अर्ज पाठवण्यापूर्वी recruitment@indbankonline.com वर अर्ज पाठवावा.
निवड प्रक्रिया – यासाठी मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
अधिकृत वेबसाईट – www.indbankonline.com

असा करा अर्ज

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
अर्ज शेवटच्या तारखे आगोदर सादर करावे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
उमेदवार योग्यरित्या भरलेल्या अर्जाची स्कॅन प्रत encruitment@indbankonline.com वर देखील पाठवू शकतो.
तसेच वरील नमूद केलेल्या पत्त्यावर नोंदणीकृत/ स्पीड पोस्टद्वारे स्वाक्षरी केलेली हार्ड कॉपी पाठविणे अनिवार्य आहे.

Recent Articles